पारोळा : १०१ ते २५० हेक्टर सिंचन क्षमतेचा कोल्हापूर पध्दत बंधारा या योजनेचे काम पूर्ण व्हावे यासाठी भिलाली ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले असून त्याची दखल घेतलेली नाही. उपोषण अजून तीव्र करण्याचा इशारा करण्यात आला आहे. या बंधाºयासाठी पाच वेळेस उपोषणाला बसावे लागण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.गेल्या पाच वर्षापासून मंजूर असलेला भिलाली कोल्हापूर पद्धतीने बंधाºयाचे संघर्षमय काम सुरु आहे. ८० टक्के काम झाले असून वीस टक्के कामासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. शासनाच्या किरकोळ तांत्रिक बाबीमुळे कामकाज अपूर्ण आहे व याचा फटका ग्रामस्थांना बसत आहे.२१ पासून गावातील दीपक नामदेव पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य गोकुळ पवार, सतीश पाटील, दत्तराव पाटील, गोरख पाटील, आनंद पाटील, सुधाकर पाटील, शरद पाटील, अनमोल साळुंखे, भूषण पाटील तसेच ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक कुटुंब व गुरांसह उपोषणाला बसले आहेत. माजी आमदार चिमणराव पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, जि.प. सदस्य रोहिदास पाटील, कृऊबा उपसभापती मधुकर पाटील, संचालक प्रा.बी.एन. पाटील, तहसीलदार आदींनी भेट दिली व उपोषणाला पाठिंबा दिला.जो पर्यंत बंधाºयाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. शासन पाण्यासाठी करोडो रुपये खर्च करत आहे आणि अल्पशा निधीसाठी हे काम होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
एका बंधाऱ्यासाठी पाचव्यांदा उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 10:20 PM