जळगाव : महापालिकेच्या सप्टेंबर 2018 मध्ये होणा:या निवडणुकीसाठी पहिल्या अडीच वर्षासाठी महापौर पदाचे आरक्षण मागास प्रवर्ग महिलेसाठी निघाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या स्थापनेनंतर पाचव्यांदा महिलेस महापौर पदाचा मान मिळणार आहे. शहरात 2003 पूर्वी अ वर्ग नगरपालिका होती. मात्र शहराची लोकसंख्या पाच लाखांच्या वर गेल्याने शासनाने नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत केले. 21 मार्च 2003 रोजी महापालिकेची स्थापना केली.पहिल्या दोन महिला महापौरमहापालिकेची स्थापना झाल्यानंतर तत्कालीन पालिका बरखास्त करण्यात आली. सहा महिने प्रशासकीय राजवट होती. त्यानंतर झालेल्या निवडणुकीनंतर पहिल्या महापौरपदाचा मान आशा दिलीप कोल्हे यांना मिळाला. 21 सप्टेंबर03 ते 20 मार्च 06 असा त्यांच्या महापौर पदाचा कार्यकाळ होता. त्या नंतरच्या अडिच वर्षासाठी म्हणजे 21 मार्च 03 ते 20 सप्टेंबर 08 या कालाधीसाठी दुस:या महापौर पदाचा मान तनुजा अजित तडवी यांना मिळाला. यानंतर 3 मार्च 2012 ते 15 मार्च 2013 या कालावधीत जयश्री अशोक धांडे या महापौर होत्या. त्यानंतर 20 सप्टेंबर 2013 ते 9 मार्च 2016 या कालावधीसाठी राखी शामकांत सोनवणे यांना महापौर पदाची संधी मिळाली. नव्या आरक्षणानुसार सप्टेंबर 2018 नंतरच्या काळासाठी होणा:या निवडणुकीत पाचव्यांदा एका महिलेस महापौरपदाची संधी मिळणार आहे.
पाचव्यांदा महिलेला महापौरपदाची संधी
By admin | Published: February 04, 2017 12:50 AM