पारोळा : ( रावसाहेब भोसले) लढवय्ये आमदार स्व. भास्करराव पाटील यांचा राजकीय वसा आणि वारसा त्यांचे पुत्र आमदार डॉ. सतीश पाटील, व नातू जि. प. सदस्य रोहन पाटील हे समर्थपणे सांभाळत आहेत. ही राजकारणातील तिसरी पिढी आहे.स्व. आमदार भास्करराव पाटील हे तलाठ्याची नोकरी सोडून सक्रिय राजकारणात आले. सन १९७१ साली ते पारोळा भडगाव मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले. आमदार पाटील यांचा पाणी हा जिव्हाळ्याचा विषय होता. त्याची फलश्रुती म्हणून भास्करराव अप्पांनी भांडून आणलेले बोरी धरण. त्याचबरोबर १३२ के. व्ही. वीज प्रकल्प त्यांनी आणला. तालुक्यात हरितक्रांती केली. त्या नंतर तालुक्यात उच्च शिक्षणाची किसान महाविद्यालयाच्या माध्यमातून सोय सुरू केली म्हणून तीन वेळा आमदार म्हणून त्यांना लोकांनी निवडून दिले . मानवता हाच धर्म असून पुरुष आणि स्त्री ह्या दोनच जाती असल्याचे ते सांगत. वडील आमदार असताना डॉ. सतीश पाटील हे राजकारणात सक्रिय झाले. ते पंचायत समितीचे सभापती त्या वेळी होते. घरातून वडिलांकडून राजकारणाचे बाळकडू मिळाले होते वडिलांचा राजकीय वसा आणि वारसा जपत तो पुढे चालवीत असतांना वडिलांनी आणलेल्या बोरी धरणात ७२ कि.मी.वरून गिरणेचे वाया जाणारे पाणी बोरी धरणात टाकून तालुक्यातील दुष्काळावर त्यांनी मात केली आणि तालुका टँकरमुक्त केला. वडिलांनी तालुक्यात शिक्षणाचे जे जाळे पसरविले ते काटेकोरपणे सांभाळीत आहेत. स्व. आमदार भास्करराव पाटील यांनी पाणी प्रश्न जिव्हाळ्याचा मानला होता. तोच कित्ता गिरवत आमदार डॉ. सतीश पाटील यांनी पारोळा तालुक्यात नदी जोड प्रकल्प यशस्वी केला आणि जिल्ह्यासाठी नदी जोड हे मॉडेल ठरले.आमदार डॉ. सतीश पाटील यांना २००९-१० साली राज्यमंत्री पद मिळाले त्याचा फायदा मतदारसंघासाठी केला. जिल्ह्यात जलसंधारणाची कामे केली तालुका तेथे क्रीडा संकुलाच्या माध्यमातून क्रीडांगण उभारले तालुक्यातील अनेक लोकांच्या धरणात जमीनी गेल्या. त्याचा मोबदला मिळवून दिला. डॉ. सतीश पाटील यांचा वारसा मुलगा रोहन पाटील यांनी स्विकारला असून ते विद्यमान जिल्हा परिषद सदस्य म्हणून तामसवाडी-देवगाव गटाचे नेतृत्व करीत आहेत. या कुटुंबाची ही तिसरी पिढी राजकारणात सक्रीय आहे.
लढवय्ये आमदार स्व. भास्करराव पाटील यांचा वसा आणि वारसा सांभाळतायंत पिता-पुत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 4:13 PM
स्व. भास्करराव पाटील यांचा राजकीय वसा आणि वारसा त्यांचे पुत्र आमदार डॉ. सतीश पाटील, व नातू जि. प. सदस्य रोहन पाटील हे समर्थपणे सांभाळत आहेत.
ठळक मुद्दे स्व. भास्करराव पाटील यांचा पाणी हा जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी शासनाशी भांडून बोरी धरण तालुक्यात आणले. आमदार डॉ. सतीश पाटील यांना २००९-१० साली राज्यमंत्री पद मिळाल्याने त्यांनी जिल्ह्यात जलसंधारणाची कामे केली.