मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक ललित कोल्हे यांच्याविरुद्ध पत्नीचा मानसिक छळ तसेच फसवणूक केल्याच्या आरोपांवरून जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भक्ती ऊर्फ रुबी कोल्हे यांनी केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललित कोल्हेंसोबत 12 एप्रिल 2004 रोजी मीरा रोड येथे नोंदणी पद्धतीने आपला विवाह झाला. त्यानंतर जळगाव येथे गेल्यावर ललितचे त्यापूर्वी दोन विवाह झाले असून, त्यांना मुलेही असल्याचे समजले. ललित यांच्या पहिल्या प}ीने आत्महत्या केली होती आणि त्याप्रकरणी त्यांना अटक होऊन निदरेष सुटका झाली होती, असे भक्ती कोल्हे यांनी म्हटले आहे. त्यानंतर आपण जळगाव येथील घर सोडून जावे यासाठी कोल्हे कुटुंबियांनी आपला मानसिक छळ सुरू केला. त्याचबरोबर मारहाणही केली जात असल्याचे भक्ती यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पती ललित कोल्हेसोबत सासरा विजय, सासू सिंधू, नणंद वंदना चौधरी, काजल आणि ललितची प्रेयसी सुकन्या भट्टाचार्य हिच्याविरुद्धही भा.दं.वि. 498 (अ), 420, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरच्या मंडळींकडून होणा:या छळाबाबत भक्ती यांनी यापूर्वीही पोलिसांत तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी त्याची दखल न घेतल्याने त्यांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. याप्रकरणी न्यायालयाने रामानंदनगर पोलिसांमार्फत ललित कोल्हेसह 11 जणांविरुद्ध समन्स जारी केले होते. हा माझा घरगुती विषय आहे. माङयाविरुद्ध दाखल झालेला गुन्हा खोटा आहे, त्यामुळे मला या विषयावर काहीही बोलायचे नाही. -ललित कोल्हे, नरगसेवक, मनसे (प्रतिनिधी)
ललित कोल्हेंविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Published: February 01, 2016 12:35 AM