शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मला गोळ्या झाडा मी मरणार नाही, तुम्हाला सोडणार"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
4
“देवेंद्र फडणवीस यांची ही ‘लाडका विनोद’ योजना आहे का?”; काँग्रेसची खोचक टीका
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
7
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
8
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
9
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
10
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
11
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
12
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
13
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
14
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
15
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
16
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
17
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
18
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
19
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप

मतदान आकडेवारीत घोळामुळे भडगावला एका केंद्रावर २९ रोजी फेरमतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:15 PM

जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघातील भडगाव येथील मतदान केंद्र क्रमांक १०७वर मॉक पोल व्यतिरिक्त तीन मते अधिक आढळून ...

जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघातील भडगाव येथील मतदान केंद्र क्रमांक १०७वर मॉक पोल व्यतिरिक्त तीन मते अधिक आढळून आल्याने या केंद्रावर आता २९ रोजी पुनर्मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणी गुरुवारी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी मतदान केंद्राध्यक्षांसह दोघांना निलंबित केले होते. या निवडणुकीतील निलंबनाच्या पहिल्याच घटनेनंतर पुनर्मतनाचीही ही पहिलीच घटना आहे.२३ एप्रिल रोजी मतदानावेळी जळगाव लोकसभा मतदार संघात भडगाव येथील मतदान केंद्र क्र.१०७ वर मतदान केंद्रावरील अधिकारी मॉकपोलचे (अभिरूप मतदान) ५० मत डिलीट करायलाच विसरून गेल्याचा प्रकार नंतर लक्षात आला होता. मात्र तपासणीत या ५० मतांव्यतिरिक्त आणखी ३ अतिरिक्त मते आढळून आले होते. केंद्राध्यक्ष उद्धवराव पाटील व मतदान अधिकारी क्र.३ सुनीता देवरे यांनी मतदानावेळी मॉक पोल केल्यानंतर कंट्रोल युनिटमधील डाटा क्लिअर केला नाही. त्यामुळे मॉकपोलचे (अभिरूप मतदान) ५० मत मशिनमध्ये तसेच राहून त्यापुढे मतदान सुरू झाले. मात्र मतदान केंद्राध्यक्ष यांची दैनंदिनी व नोंदवलेल्या मतांचा हिशोब (नमुना १७-क) व मतदार नोंदवही (नमुना १७-अ) यांच्या तपासणीत मतदार नोंदवहीत ५५५ मतदारांची नोंद आहे. तसेच मतांच्या हिशेबातही ५५५ मते नोंदविल्याचे नमूद आहे. मात्र क्षेत्रीय अधिकारी यांच्या अहवालानुसार मतदान यंत्रात झालेले मतदान ६०८ असल्याने ५३ मतांचा फरक आढळून आला. त्यापैकी मॉकपोलच्या ५० मतांव्यतिरिक्त ३ मतांचा फरक आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मतदार नोंदवहीत नोंद न घेताच ३ जास्तीची मते मतदान यंत्रात नोंदविल्याचे स्पष्ट झाले. या प्रकाराची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन निवडणूक आयोगाकडे याबाबत अहवाल पाठविला होता.राज्य निवडणूक आयोगाने हा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविला. त्यानुसार शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने या मतदान केंद्रावर पुनर्मतदान घेण्याचा निर्णय घेतला व तसे पत्र राज्याच्या मुख्य निवडणूक आयोगाला पाठविले असून जिल्हा प्रशासनालाही तसे सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार आता या मतदान केंद्रावर २९ एप्रिल रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत पुन्हा मतदान होणार आहे. यासाठी सर्व नवीन मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांची (पोलिंग पार्टी) नियुक्ती करावी, असेही नमूद केले आहे.दरम्यान, या प्रकरणी मतदान केंद्राध्यक्ष उद्धवराव पाटील व मतदान केंद्र अधिकारी क्र.३ सुनीता देवरे यांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१चे कलम २७, २८, व २८-अ अन्वये कायदेशीर जबाबदारी पार पाडलेली नसून अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव