शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

माहेरात फुलवली ‘छाया’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 12:12 AM

छाया सतीश पाटील यांनी तयार केले व्हिलेज गार्डन

धरणगाव : ‘बालपणीच्या आठवणी, त्या स्वप्नात मी आजही रमते....! माहेरची ओढ मात्र मनात काहूर माजवते !! या काव्यपंक्तीप्रमाणे सासरवाशीण असलेल्या प्रत्येक स्त्रीला माहेरची ओढ लागल्या शिवाय राहत नाही. अशाच एका सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या महिलेने आपल्या माहेरात ‘व्हिलेज गार्डन’ फुलवून माहेरच्या लोकांना छाया दिली आहे. त्यांच्या या कामामुळे चमगावची कायापालट झाल्याचे चित्र पहायला मिळते.छाया सतीश पाटील असे या महिलेचे नाव असून त्या एरंडोल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ए.एस.पाटील यांच्या सुकन्या आहेत. वडिलांच्या संस्काराने व मुंबई एमआयडीसीचे सोशल अधिकारी असलेले पती सतीश पाटील यांच्या सहकार्याने त्यांनी ठाणे (मुंबई) येथे ‘ग्रीन अर्थ लव्हर्स आॅफ नेचर’ या सेवाभावी सामाजिक संस्थेची स्थापना करून मुंबई परिसरात पर्यावरण संवर्धनाचे, वृक्ष लागवडीचे काम केले आहे.गेल्या सात-आठ वर्षापूर्वी त्या माहेर असलेल्या चमगाव ता.धरणगाव येथे आल्या असताना बालपणीच्या आपल्या आठवणींना उजाळा मिळाला. त्यांनी गावात आपल्या संस्थेतर्फे विकास करण्याचे ठरवले व आपले माहेर असलेल्या चमगावला छानसे ‘व्हिलेज गार्डन’ तयार करून बाग फुलवली. बागेत सिमेंट बाक बसविले. वृक्षारोपण करून ग्रामस्थांकडे त्या वृक्षाची संवर्धनाची जबाबदारी सोपवली. एवढच नव्हे तर गावातील तरडे, दहिदुले, वाकटुकी, अंजनविहिरे या गावांच्या हुशार बालगोपाल विद्यार्थ्यांसाठी दप्तर, वह्या, पुस्तकांचे वाटप, आरोग्य शिबिरे भरून आपल्या माहेरला फुलविण्याचे काम करून आपला वेगळा ठसा उमटविला.हे सामाजिक कार्याचे बाळकडू मला माझे वडील प्राचार्य कै.ए.एस.पाटील यांच्याकडून तर प्रेरणा पती सतीश पाटील व मावस बहिण माजी आरोग्य मंत्री शोभा बच्छाव यांच्याकडून मिळाल्याचे त्या अभिमानाने सांगतात. मला गावातील ज्येष्ठ मंडळी ईश्वर पाटील, डॉ.नितीन पाटील, अशोक पाटील, रमेश पाटील, रंगराव पाटील, गजानन पाटील, पंजाबराव सावंत, संजय शिरसाठ, शिवाजी सावंत, संदीप सावंत, गुलाल पाटील, ओंकार पाटील व सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभल्याचे त्या सांगतात.चमगावात ग्रामस्थांसाठी बागबगीचा फुलवून वृक्ष लागवड करून गावात सुविचार लिहून, गार्डनचे प्रवेशद्वार, संरक्षक भिंत बांधून व गावाचे रुप पालटवले याचा आनंद असून आजही गावात नवीन काही करण्याचा माझा मानस असल्याचे छाया पाटील यांंनी सांगितले. शहरात काम करण्यापेक्षा आपल्या छोट्याशा गावात काही तरी केल्याचे समाधान आहे. त्यांच्या या कार्याने माहेरची मंडळी समाधानी आहेत.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव