जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकांसाठी गुरूवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. मात्र, हरकती अधिक असल्याने आणि वेळ कमी असल्याने एकत्रीत सर्व जिल्ह्यांनी निर्णय घेतल्यानंतर आता ही यादी १४ डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे.
जिल्ह्यातील प्रारूप मतदार याद्यांवरही हरकतींचा पाऊस पडला होता. जिल्हाभरातून एकत्रित २२९७ हरकती प्राप्त झालेल्या होत्या. त्यात जळगाव तालुक्यात सर्वाधिक ६६८ हरकती आलेल्या होत्या. त्या खालोखाल चाळीसगाव ३८०, पारोळा २१२, यावल १९०, रावेर १८८, भडगाव १४३, पाचोरा १०४, जामनेर ९७, अमळनेर ९३, धरणगाव ७०, बोदवड ४८, मुक्ताईनगर ४४, चोपडा ४२, भुसावळ ३६, एरंडोल १२ अशा हरकती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या आहे. वेळ कमी असल्याने हरकती अधिक असल्याने ही मुदतवाढ घेण्यात आली आहे.