पुणे : भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीन खरेदीच्या गैरव्यवहारप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे, जावई गिरीश चौधरी तसेच जमीन विकणारे उकानी यांच्याविरुद्ध अखेर सोमवारी बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. जमीन खरेदी केलीच नाही, असे घूमजाव करणा:या खडसे यांना न्यायालयाने चांगलाच दणका दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भोसरी येथील सव्र्हे नं. 52 मधील तीन एकर जागा अब्बास उकानी आणि हसनैन झोएब उकानी (रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) यांच्या मालकीची आहे. उकानी यांची जमीन चाळीस वर्षापूर्वी एमआयडीसीकडून संपादित करण्यात आली होती. ही जमीन परत (पान 9 वर)अखेर खडसेंविरूद्ध पुण्यात गुन्हा दाखलमिळावी यासाठी उकानी यांनी 8 सप्टेंबर 2015 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र उकानी यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानंतर उकानी यांची ही जमीन खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी 3 कोटी 75 लाख रूपयांना खरेदी केली. पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टँप ड्यूटी म्हणून 1 कोटी 37 लाख रूपये भरण्यात आले. या जमीन व्यवहार प्रकरणात खडसे यांनी पदाचा गैरवापर केला. त्यामुळे खडसे यांच्यासह मंदाकिनी खडसे, जावई गिरीश चौधरी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, असा तक्रार अर्ज पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी काही महिन्यांपूर्वी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिला होता. तर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपविण्यात आला. तसेच, न्या. झोटींग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली. हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश 8 मार्च 2017 रोजी दिला एसीबीला होता. मात्र, तरीही बंडगार्डन पोलीसांनी खडसे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शविली होती. त्यावर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश चौधरी आणि उकानी यांच्याविरूद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 13 (1) ड, (2), (15) आणि भादविं 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अतिरिक्त पोलीस अधिक्षक प्रसाद हसबनीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (प्रतिनिधी) सत्य समोर येईलचचौकशीचा हा विषय आहे. हेमंत गावंडे यांनी ही तक्रार केली होती. यापूर्वीही आठ महिने चौकशी झाली आहे. त्यात कोणतेही तथ्य नसून दखलपात्र नसल्याचे प्रतिज्ञापत्र हायकोर्टाकडे पोलिसांनी दिले आहे. तरीही पुन्हा चौकशी होणार आहे. एका गोष्टीची चार वेळा चौकशी होत आहे. याच विषयासाठी न्या.झोटिंग आयोग नेमला गेला. आता पुन्हा ही कारवाई होत आहे. गावंडेंवर कृषी महाविद्यालयाच्या जमिनीच्या व्यवहारप्रकरणी टीडीआरची तक्रार आहे. दाऊद फोन संभाषण, पी.ए. लाच प्रकरण असे अनेक आरोप झाले. त्यात तथ्य नसल्याचेच समोर आले आहे. आता एसीबीकडून चौकशी होईल. सत्य समोर येईलच. -एकनाथराव खडसे, माजी मंत्री
अखेर खडसेंविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल
By admin | Published: April 11, 2017 12:35 AM