जळगाव - परधाडे, ता. पाचोरा येथील रेल्वे अपघातातील प्रवाशांचे मृतदेह नेपाळला नेण्यासाठी तिथल्या दूतावासाने राज्य शासनाला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री भुसावळहून रेल्वेने निघालेले ६ जणांचे मृतदेह गोरखपूरपर्यंत आणि. तेथून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या नेपाळ सिमेवरुन संबंधित प्रवाशांच्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा आहे.
राज्यभरात मृतदेह नेण्यासाठी परवानगी देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. तर अन्य देशात नेण्यासाठी केंद्रीय पातळीवरुन परवानगी घ्यावी लागते. मात्र मुख्यमंत्री कार्यालयासह आपत्ती व्यवस्थापन विभागाने मयत प्रवाशांचे मृतदेह नेपाळमध्ये नेण्यासाठी राज्य शासन खर्च करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. तर केंद्रीय पातळीवरुनही सकाळपासूनच पाठपुरावा सुरु करण्यात आला. नेपाळमधील भारतीय दूतावासाने मयत प्रवाशांचे मृतदेह गोरखपूरपर्यंत पोहोच करुन नेपाळ सिमेवर आणल्यास नेपाळ शासनाच्यावतीने संबंधित मृतदेह त्यांच्या गावी पोहोचविण्याची तयारी दाखविली. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी मृत प्रवाशांचे दस्ताऐवज नेपाळ दूतावासाला पाठविले.
मृतदेह पोहोच करण्यासाठी सर्व खर्च राज्य शासन करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी तशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच गिरीश महाजन यांनीही या प्रवासाच्यादृष्टीने मदतीचा हात दिला आहे.- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी.
उजनीच्या दुर्दैवी घटनेची २२ वर्षांनी पुनरावृत्तीबोदवड (जि. जळगाव) : पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकादरम्यान पुष्पक एक्स्प्रेसचे प्रवासी कर्नाटक एक्स्प्रेसखाली चिरडले गेल्याच्या दुर्दैवी घटनेने तब्बल २२ वर्षांपूर्वी घडलेल्या दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या. त्यावेळी तब्बल १७ प्रवासी गीतांजली एक्स्प्रेसखाली चिरडले गेले होते. बोदवड तालुक्यातील उजनी येथे ही घटना घडली होती.