अमळनेर : शेतकºयांना पीक विमा मिळण्यासाठी शासनाने वर्ष २०१७ मध्ये आॅनलाईन प्रक्रिया राबविली होती. वेबसाईटच्या वारंवार मिर्माण होणाºया अडचणींमुळे अनेकांनी अर्ज भरलेच नाहीत. त्यानंतर शासनाने आॅफलाईन सुविधेद्वारे अर्ज सादर करण्यासाठी वाढीव मुदत दिली होती. अखेर दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तालुक्यातील ३४१ शेतकºयांचा ६१ लाखांचा पीक विमा मंजूर झाला. त्यामुळे दुष्काळात होरपळलेल्या शेतकºयांना पेरणीसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.प्रधानमंत्री पीक विमा ोजनेअंतर्गत शेतकºयांना वर्ष २०१७ चा पीक विमा मिळण्यासाठी शासनातर्फे सुरुवातीला आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. वेबसाईट बंदची समस्या सातत्याने येत होती. यामुळे शेतकºयांची तारांबळ उडाली. सेतू सुविधा केंद्राबाहेर व राष्ट्रीयीकृत बँकेत रांगा लागलेल्या असायच्या. याचा विचार करून शासनाने पीक विमा काढण्यासाठी आॅफलाइन अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवून दिली होती. यामध्ये तालुका कृषी अधिकारी भरत वारे, उपविभागीय कृषी अधिकारी डी. बी. जाधवार, माजी सभापती श्याम आहिरे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सरकारने अमळनेर तालुक्यातील आॅफलाइन पीक विमा अर्ज दाखल केलेल्या शेतकºयांना विमा रक्कम मंजूर करून बी-बियाणे खरेदीसाठी दिलासा दिला आहे. यामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.लवकरच शेतकºयांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांनी सांगितले. यात दुष्काळी परिस्थितीत होरपळून निघालेल्या शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे.कागदपत्रे त्वरित जमा करण्याचे आवाहनज्या शेतकºयांनी २०१७ या वर्षी सेतू सुविधा केंद्रात किंवा बँकेत आॅफलाइन अर्ज दाखल केलेल्या ३४१ शेतकºयांची सर्व माहिती वरिष्ठ अधिकारी व शासनाला सादर केली होती व पाठपुरावा केला. त्यांना कापूस, मूग, ज्वारी अशा पीक प्रकारानुसार एकूण ६० लाख ६७ हजार २८२ रुपये इतकी पीक विमा संरक्षण रक्कम शासनाने मंजूर केली आहे. त्यांनी त्वरित कागदपत्रे कृषी कार्यालयात जमा करावीत, असे आवाहन तालुका कृषी अधिकाºयांनी केले आहे.
अखेर ‘त्या’ ३४१ शेतकऱ्यांना ६० लाख पीक विमा मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 7:06 PM