भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे डीआरएम सुधीर कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आज 9 फेब्रुवारी रोजी अचानक राबविण्यात आलेल्या मोठय़ा प्रणावरील तिकिट तपासणी मोहीमेत (बस रेड/अब्मुॅस चेक) तब्बल 191 विना तिकिट प्रवाशांकडून 71 हजार 740 रुपये दंड वसूल करण्यात आला. या अचानक व बसने जावून राबविण्यात आलेल्या तिकिट तपासणी मोहीमेमुळे रेल्वेने तिकिट न काढता फुकट प्रवास करणा:या प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेर्पयत भुसावळ विभागातील वरणगाव रेल्वे स्थानकावर पॅसेंजरसह जलद, अतिजलद मेल/ एक्स्प्रेस गाडय़ा थांबवून पथकातील रेल्वे कर्मचारी, अधिकारी यांनी प्रवाशांकडील तिकिटांची तपासणी केली. ज्या प्रवाशांकडे प्रवासाचे तिकिट नव्हते त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल करून त्यांना रितसर पावती देण्यात आली.या तिकिट तपासणी मोहीमेत 191 प्रवासी विना तिकिट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून दंडासहीत 71 हजार 740 रुपये दंड वसूल करण्यात आला शिवाय अनियमित प्रवास करणा:या 268 प्रवाशांकडून एक लाख पाच हजार 835 रुपयांची वसुली करण्यात आली. रेल्वे प्रवास करताना सामान (लगेज) बूक न करता प्रवास करणा:या 11 प्रवाशांकडून 1 हजार 120 रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. भुसावळ रेल्वे विभागातर्फे राबविण्यात आलेल्या या मोहीमेत एकूण 470 केसेस व एक लाख 78 हजार 695 रुपये दंड वसूल करण्यात आला. रेल्वेचे पथक बसने जावून ज्या रेल्वे स्थानकावर तिकिट तपासणी मोहीम राबवायची आहे. त्या स्थानकार्पयत बसने जावून अचानक गाडी थांबवून प्रवाशांकडील तिकिटांची तपासणी करण्याच्या या अनोख्या पद्धतीने प्रवाशीही बुचकळ्यात पडले आहेत. मेल/ एक्प्रेस लहान स्थानकावर थांबविण्याची पद्धतही नवीन आहे.(प्रतिनिधी)तपासणीतील सहभाग2 सुधीर कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यात वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक व्ही.पी.दहाट, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार, तिकिट निरीक्षक बी.एस़तडवी, मुख्य निरीक्षक एच. एस.अहुवालिया यांच्या नेतृत्वाखाली 37 तिकिट तपासणी कर्मचारी, 23 आरपीएफ व लोहमार्ग पोलीसचे दहा कर्मचारी मोहीमेत तैनात होते.या गाडय़ांमध्ये झाली तपासणी3 51183 भुसावळ-नरखेड पॅसेंजर, 11039 महाराष्ट्र एक्स्प्रेस,12833 अहमदाबाद-हावडा, 12859 मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस,12656 चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्स्प्रेस, 51198 वर्धा-भुसावळ पॅसेंजर, 17037 सिकंदराबाद बिकानेर एक्स्प्रेस, 12860 हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस,12720 हैद्राबाद-अजमेर एक्स्प्रेस वरणगाव स्थानकावर थांबवून तिकिटांची तपासणी केली.प्रवासी संख्या वाढविण्यासाठी मोहीम..4भुसावळ येथून तिकिट तपासणी पथक बसने वरणगाव येथे दाखल झाले. बसमधून उतरताच वाणिज्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी प्रवासी गाडय़ांची तपासणी केली. भुसावळ विभागातर्फे प्रथमच अशा पद्धतीने बसने जावून तिकिट तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे. या पुढेही अशाच पद्धतीने तिकिट तपासणी मोहीम राबविण्यावर भर राहील. प्रवासी संख्या वाढीसासाठी अशी मोहीम राबविली जाते, असे सांगण्यात आले आहे. यातून महसुलही वाढतो.
191 फुकटय़ा प्रवाशांकडून दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2017 11:30 PM