जळगाव : सलून व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी यासाठी जिल्हाधिकाºयांना निवेदन द्यायला गेलेल्या शहरातील ९ व्यावसायिकांविरुध्द मंगळवारी दुपारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात जमावंबदी व साथ रोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारतर्फे पोलीस कर्मचारी उमेश दंगलराव पाटील यांनी फिर्याद दिली आहे.गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये नाभिक संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र विष्णू नेरपगारे (३८), मोहन किसनराव साकवी (६१, रा.पिंप्राळा), एकनाथ परशुराम शिरसाठ (५७, रा.भडगाव), जगदीश मधुकर वाघ (५१, रा.एमआयडीसी), किशोर जगन्नाथ सूर्यवंशी (५२, रा.मायादेवी नगर), ज्ञानेश्वर दगडू सोनगिरे (४८), राजेंद्र दगडू सोनगिरे (५०, रा. रामेश्वर कॉलनी), अशोक श्रीधर महाले (५०, दादावाडी) व जयविजय गोविंद निकम (४०, रा.रामानंद नगर) यांचा समावेश आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असल्याने जिल्हाधिकाºयांनी काही अंशी लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिली आहे, त्यात सलून व्यवसायाला परवानगी दिलेली नाही, म्हणून नाभिक संघटनेच्या माध्यमातून व्यावसायिक जिल्हाधिकाºयांच्या भेटीला गेले होते, मात्र जमावबंदी आदेश लागू असल्याने पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी परवानगी मिळणार नाही व एकत्रित येण्यास बंदी असल्याचे निवेदनकर्त्यांना सांगितले. त्यानंतर व्यावसायिक भूमिकेवर ठाम असल्याने त्यांना जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.
सलून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मागायला गेलेल्या ९ जणांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 8:59 PM