आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २८ : अॅक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आणलेल्या निवृत्ती सुपडू पाटील (वय ३२ रा.कळमसरे, ता.पाचोरा) या तरुणाच्या मृत्यू प्रकरणात अॅक्सॉन ब्रेन हॉस्पिटलचे डॉ.निलेश किनगे यांच्याविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला हलगर्जीपणा व निष्काळजीपणाचा केल्याचा (कलम ३०४ अ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे प्रकरणनिवृत्ती पाटील या तरुणाचा आठ दिवसापूर्वी कुºहा-जामनेर रस्त्यावर अपघात झाला होता. दुचाकीवरुन घसल्याने डोक्याला मार लागला होता. त्यामुळे त्याला पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी निवृत्ती याची त्या दवाखान्यातून सुटका झाली. डोक्याला मार लागल्याने जळगावात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन घेऊ म्हणून नातेवाईकांनी निवृत्ती याला मंगळवारी सायंकाळी महामार्गाला लागून असलेल्या डॉ.निलेश किनगे यांच्या अॅक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये आणले. तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी निवृत्तीला अतिदक्षता विभागात ठेवण्याचा सल्ला दिला. मेंदूला सूज असल्याने शस्त्रक्रिया करावी लागेल व त्यासाठी दिड लाख रुपयांचा खर्च लागेल असे डॉक्टरांनी सांगितले होते. तत्पूर्वी एका खासगी दवाखान्यातून सीटी स्कॅनही करण्यात आले होते.त्यानुसार निवृत्ती पाटील या तरुणावर अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियेसाठी नातेवाईकांनी दीड लाख रुपयेही आणले, मात्र डॉक्टर निलेश किनगे हे बाहेरगावी निघून गेले व त्या काळात रुग्णाचा मृत्यू झाला.
रुग्णाच्या मृत्यू प्रकरणी जळगावात डॉ.निलेश किनगे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 10:30 PM
अॅक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आणलेल्या निवृत्ती सुपडू पाटील (वय ३२ रा.कळमसरे, ता.पाचोरा) या तरुणाच्या मृत्यू प्रकरणात अॅक्सॉन ब्रेन हॉस्पिटलचे डॉ.निलेश किनगे यांच्याविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला हलगर्जीपणा व निष्काळजीपणाचा केल्याचा (कलम ३०४ अ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे उपचारात हलगर्जीपणा व निष्काळजीपणाचा ठपकाडॉक्टर नसतानाही दाखल केले अतिदक्षता विभागात कलम ३०४ अ गुन्हा दाखल