जळगाव : नागपूर येथून नाशिक येथे कोळसा घेऊन जाणाºया रेल्वे मालगाडीच्या सहाव्या क्रमांकाच्या बोगीला अचानक आग लागल्याने तारांबळ उडाली होती. सोमवारी रात्री नऊ वाजता ही गाडी जळगाव स्थानकावर आली तेव्हा ही घटना उघडकीस आली.दरम्यान, अग्निशमन दलाचा बंब मागवून ही आग विझविण्यात आली. वेळीच ही घटना लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. यावेळी रेल्वे अधिका-यांची प्रचंड धावपळ उडाली होती.प्लॅटफार्म क्रमांक एकवर ही मालगाडी आली असता सहाव्या बोगीतून धूर निघत असल्याचे रेल्वे कर्मचाºयांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ सिग्नल देऊन ही गाडी थांबविली. मनपा अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले, मात्र सहा क्रमांकाची बोगी फ्लॅटफार्मवर असल्याने तेथे अग्निशमन दलाचा बंब पोहचू शकत नव्हता. त्यामुळे दुसरे इंजिन आणून रेल्वेगाडी भुसावळच्या दिशेने मागे घेण्यात आली. मालधक्कयाजवळ ही बोगी आल्यानंतर पाण्याच्या सहाय्याने ही आग विझविण्यात आली. रात्री साडे दहा वाजेपर्यंत गाडी स्थानकावर थांबून होती.
कोळसा घेऊन जाणाऱ्या रेल्वेच्या बोगीला आग, जळगाव रेल्वे स्टेशनवर विझविली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:46 PM
मोठी दुर्घटना टळली
ठळक मुद्देअग्निशमन दलाला केले पाचारण रेल्वे अधिका-यांची प्रचंड धावपळ