जळगाव : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अवैध धंद्यांविरुध्द पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे. सोमवारी सकाळीच सिंगापूर कंजरवाडा या भागात एमआयडीसी पोलिसांनी धाडसत्र राबवून गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. यात ७९ हजार ४०० रुपये किमतीची गावठी दारू व रसायन असा एक लाखाचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.दरम्यान, या कारवाईत निकिता गोविंदा बागडे, गीता राकेश बागडे, शोभा अनिल बागडे, वनाबाई देवीदास बाटुंगे व ममता मंगेश अभंगे या सहा महिलांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. पोलीस निरीक्षक अनिरुध्द अढाव, उपनिरीक्षक नीलेश सोळंके, सहायक फौजदार अतुल वंजारी, प्रकाश निंबाळकर, परीश जाधव, विजय नेरकर, सचिन मुंडे, अतुल पाटील, भरत जेठवे, विजय पाटील, किशोर पाटील, अशोक सनकत, हेमंत कळसकर, सिध्दार्थ लटपटे, नामदेव पाटील, प्रवीणा जाधव, वैशाली पावरा, अश्विनी चौधरी, मीनाक्षी घेटे, मोनाली कळसकर, जयश्री ठेंगळे, राजेंद्र पाटील व आरसीपी प्लाटून यांचा ताफा सकाळीच कंजरवाड्यात धडकला.महापालिका निवडणूक व विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छोरिंग दोरजे यांच्या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवैध धंद्यावर धाडसत्र सुरू केले आहे. हुक्का साहित्य विक्री व हुक्का पार्लर या दोन