ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 29 - सेंट्रल फुले मार्केटमध्ये दुस:या मजल्यावर मयुर टेलर्स या दुकानाला रविवारी सकाळी अचानक आग लागली. त्यात शिलाई मशीन, काऊंटर, शिवून तयार केलेले ड्रेस व कच्चे कपडे असा 3 लाख 95 हजाराचा ऐवज जळून खाक झाला आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.जितेंद्र वल्लभभाई हिंगू (वय 41, रा. आदर्श नगर, जळगाव) यांचा टेलरींगचा व्यवसाय असून सेंट्रल फुले मार्केटमध्ये दुस:या मजल्यावर 45 क्रमांकाच्या दुकानात त्यांनी मयुर टेलर्स नावाने व्यवसाय सुरु केला आहे. या दुकानात अन्य कारागिरांकडूनही काम केले जाते. सकाळी साडे आठ ते रात्री 9 या वेळेत दुकानात कामकाज चालते. रविवारी सकाळी साडे आठ वाजता जितेंद्र हे परिवारासह लांडोरखोरी उद्यानात फिरत असताना दुकानातील कारागीर प्रदीप सोनवणे (रा.मेहरुण, जळगाव) यांनी दुकानात आग लागल्याची माहिती दिली. सोनवणे हे दुकानाची साफसफाई करण्यासाठी गेले असता आतून धूर येत असल्याचे लक्षात आले. त्यांनी दुकान उघडून पाहिले असता दुकानातील मशिन, लाकडी कांऊटर, कच्चे कपडे, कॅनव्हास व शिवलेले कपडे जळालेले होते. अगिAशमन दलाचा बंब मागविण्यात आला, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे लोकांचे 50 तयार ड्रेस जळाले आहेत.पिंप्राळ्यात गादीच्या दुकानात आगपिंप्राळा येथील वखार जवळ गादीच्या दुकानात रविवारी दुपारी अचानक लागली होती. त्यात गादी भरण्यासाठी लागणारा कापूस जळून खाक झाला आहे. अमिन शेख भिकन पिंजारी यांच्या मालकीचे पिंप्राळ्यात दोस्ती गांधी भंडार नावाचे हे दुकान आहे. व्यापारी व शेतक:यांकडून कापूस खरेदी करतात. दुकानात पिंजून ते गाद्या भरुन विक्री करतात. रविवारी या दुकानात अचानक आग लागली. यात दुकानातील कापूस जळून किरकोळ नुकसान झाले आहे.