ऑनलाइन लोकमतहरताळे(ता.मुक्ताईनगर), दि. 04 - जंगलातील वणवा तीन दिवसांपासून सुरू आहे. तो आटोक्यात येत नसल्याने प्रशासनही हतबल झाले आहे. वणव्यात वनसंपदेसह वन्य प्राणी जळून खाक झाले आहेत.वढवे जंगल,सलई पऱ्हाळा,बेलखोरा या भागासह हरताळे येथील पर्यटन स्थळापर्यंत आग पोहचली आहे. वणवा अद्यापही सुरुच आहे. तो विझविण्याचे प्रयत्न सुरू आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी वढवे जंगलातील आग विझवण्यास प्रशासन यशस्वी ठरले असता पुन्हा दुसऱ्या दिवशीही कंपार्टमेंट ५३२, ५३३ मधील भाग गेल्या दोन दिवसापासून पेटतच आहे. डोंगराळ भाग असल्याने त्या ठिकाणी अग्नीशमन दलाचा वापर करणे कठीण आहे. डोंगरदऱ्यांमध्ये मोठी कसरत होत आहे. सुरूवातीला जंगलाला आग लागत असताना पाहिजे तशी दखल घेतली न गेल्याचा आरोप ग्रामस्थांतर्फे करण्यात आला. जेव्हा प्रशासन आग विझवण्यासाठी आले तेव्हा त्यांना ग्रामस्थांनी मदत केली नाही. वणवा पेटत असताना तत्काळ आग विझविणाऱ्या मोठ्या यंत्रणेची गरज अपेक्षीत होती. आजही वणव्याची धग चालू आहे म्हणजे उपाययोजना कमी पडत असल्याचा आरोप होत आहे. जैविकहानी ही केव्हा भरून निघणार असा प्रश्न आहे. मोठे हिरवेगार वृक्ष पेटतच आहे. त्यात असलेली वन्यजीव हानी ही कधीही भरून न निघणारी नाही. त्यासाठी तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. २०० हेक्टरवरील भाग जळून खाक झाला आहे.
हरताळे जंगलातील अग्नी तांडव सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2017 5:00 PM