विवरे, ता.रावेर/चांगदेव, ता.मुक्ताईनगर : रावेर तालुक्यातील विवरे व मुक्ताईनगर तालुक्यातील मेहूण येथे लागलेल्या आगीत मका जळून खाक झाला. यात शेतक:यांचे मोठे नुकसान झाले.चांगदेव- मेहूण येथील गोपाळ तुकाराम पाटील यांच्या एक एकर शेतातील उभ्या मक्याचे पीक शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाले. यात ठिबक संचही जळाले. यात सुमारे एक लाखाचे नुकसान झाल्याचे गोपाळ चौधरी यांनी सांगितले. ही घटना सोमवारी सकाळी 8 ते दहा वाजेच्या सुमारास घडली. गेल्या चार-पाच महिन्यांपासून डीपीवरील वायर उघडय़ा पडल्या आहेत.वीज वितरणकडे याबाबत वारंवार सांगूनही दखल घेण्यात आली नाही, असा संताप माजी सरपंच विकास पाटील यांनी ‘लोकमत’जवळ बोलताना व्यक्त केला.विवरे, ता.रावेर- विपीन विजय राणे यांच्या रावेर शिवारातील गट नं. 1015 मधील 4 हेक्टर 65 आर मधील असलेल्या शेतात लावलेला मका 9 रोजी लागलेल्या अकस्मात आगीत जळून खाक झाला. यात सुमारे 10 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी पी. एन. वानखडे कृषी अधिकारी एन. व्ही. रुले यांनी केला. या घटनेमुळे हवालदिल झालेले शेतकरी उपसरपंचपती विपीन राणे यांनी दि 9 रोजी दुपारी पाहणीसाठी गेले असता त्यांना शेतात अकस्मात लागलेल्या आगीत संपूर्ण मका खाक झाल्याचे चित्र दिसले, त्यामुळे त्यांना जबर धक्का बसला. तोंडाशी आलेला घास अकस्मात आगीने हिसकावून नेल्यामुळे राणे कुटुंब हवालदिल झाले आहे. पीक लागवडीपासून कापणीर्पयत संपूर्ण मेहनतीवर पाणी फिरले आहे. (वार्ताहर)
आगीत शेतातील मका जळून खाक
By admin | Published: April 11, 2017 12:11 AM