जळगाव : एमआयडीसीतील बी सेक्टर २३ मध्ये असलेल्या स्मार्ट फार्मास्युटीकल या औषधीसाठी लागणारा कच्चा माल तयार करणाऱ्या कंपनीत उत्पादन विभागातील रिअॅक्टरला अचानक आग लागल्याची घटना २२ रोजी रात्री घडली. त्यात एक कोटी ३० लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेची मंगळवारी एमआयडीसी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, नितीन रामदास गावंडे (४३, रा. लेक सिटी, मेहरुण, जळगाव) यांच्या मालकीची एमआयडीसीतील बी सेक्टरमध्ये स्मार्ट फार्मास्युटीकल नावाची औषधीसाठी लागणारा कच्चा माल तयार करणाऱ्या कंपनीत आहे. २२ रोजी रात्री उत्पादन विभागात नेवीव्हीलॉल हायड्रोक्लोराईड उत्पादनाचे काम सुरु असताना या मशीनवरील आॅपरेटर कैलास जगन्नाथ आमोदे यांनी अिॅक्टरमधून १ किलो नेवीव्हीलॉल हायड्रोक्लोराईड काढले. त्याचवेळी रिअॅक्टरमध्ये अचानक आग लागली. त्यामुळे आमोदे तेथून तत्काळ बाजूला सरकले. कंपनीतील बाबू मिश्रा, भास्कर वाघ व इतर लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पाणी, वाळू व इतर कंपनीतील अग्निशमन यंत्रणेद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाचेही बंब मागविण्यात आले. सुदैवाने या आगीत कोणालाही दुखापत झाली नाही. व्यवस्थापक प्रशांत मगनराव सोनवणे यांनी या घटनेची माहिती मालक गावंडे यांना रात्रीच दिली. ते मुंबईला होते. दुसºया दिवशी जळगावात आल्यानंतर त्यांनी कंपनीत पाहणी केली व आगीत नेमके काय नुकसान झाले आहे याची माहिती घेतली. या आगीत ३ रिअॅक्टर, इलेक्ट्रिीक फिटींग, उत्पादन विभागाची इमारत व नेवीव्हीलॉल हायड्रोक्लोराईड या उत्पादनाच्या दोन बॅचेस अंदाजे ८३ किलो जळाले आहे. त्याची किमत १ कोटी ३० लाख रुपये इतकी आहे. मंगळवारी त्यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली.चटई कंपनीत शॉर्ट सर्कीटमुळे आगएमआयडीसीतील जी. २१ भागातील संजय प्लॅस्टिक कंपनीत वरच्या मजल्यावर कटिंग व शिलाई विभागात शिलाई मशिनच्या ईलेक्ट्रीक बोर्डात शॉर्ट सर्किट होवून चटईंना आग लागल्याची घटना २५ रोजी रात्री घडली. कंपनीतील विद्युत पुरवठा बंद करण्यात येवून फायर सिलेंडर व पाण्याचे सहाय्याने आग विझविण्यात आली. या घटनेत सुमारे ४० हजार रुपये किंमतीची चटई कटींग मशिन तसेच सुमारे ५०० किलो वजनाचे तयार चटईचे गठ्ठे त्यांची किंमत सुमारे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही. या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक श्रेयांश संजय भुत्रा यांच्या खबरीवरुन अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
औषध निर्मिती कंपनीत आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:42 AM