जळगावात घरावरील मोबाईल टॉवरला आग
By admin | Published: July 17, 2017 12:50 PM
नागरिकांनी तत्काळ शनी पेठ पोलिसांना माहिती दिली. जितेंद्र सोनवणे यांनी मनपाच्या अग्नीशमन विभागाशी संपर्क साधून बंब मागवून घेतला.
ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 17 - शनी पेठेतील रिधुरवाडय़ा रविवारी सायंकाळी साडे सात वाजता भर पावसात मोबाईल टॉवरला अचानक आग लागली. हे टॉवर रहिवाशी इमारतीच्यावर असल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड धावपळ व पळापळ झाली. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. वरुण राजा व अगिAशमन दलाच्या बंबाद्वारे ही आग आटोक्यात आणण्यात आली. एकनाथ सोमा चौधरी यांच्या घराच्या तिस:या मजल्यावर बीएसएनएल कंपनीचे मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहे. एका मजल्यावर मुलगा गजानन तर दुस:या मजल्यावर एकनाथ चौधरी राहतात.टॉवरची वातानुकुलीत खोली आहे. तेथेच यंत्र ठेवण्यात आले आहेत. यात काही तरी बिघाड झाल्याने शॉर्ट सर्कीट झाले व वायरींग जळाल्याने आगीचे लोळ बाहेर आले. पाऊस असतानाही टॉवरवर आगीचे लोळ होते. हा प्रकार पाहून चौधरी कुटुंब घराबाहेर पडले. नागरिकांनी तत्काळ शनी पेठ पोलिसांना माहिती दिली. जितेंद्र सोनवणे यांनी मनपाच्या अग्नीशमन विभागाशी संपर्क साधून बंब मागवून घेतला. एका बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. या आगीत टावरची संपूर्ण वायरिंग जळाली. वातानुकुलीत खोली शिवाय इतर कोणतेही नुकसान झाले नाही. बीएसएनएल टॉवरचे तीन तांत्रिक अधिकारी घटनास्थळी पोहचले. 2008 पासून चौधरी यांच्या घरावर हे टॉवर आहे.