हरताळे, ता. मुक्ताईनगर, जि.जळगाव : समाज मंदिरासमोरच असलेल्या बारेलाल अहिरलाल अहिरवार यांच्या घराला बुधवारी दुपारी पावणे दोनला अचानक आग लागून त्यात धान्य, जीवनावश्यक वस्तू ,कपडे जळून खाक झाले. अंदाजे सुमारे ४० हजारांचे नुकसान झाले.आग लागताच शेजारील दिलीप निकम, सचिन निकम, ग्राम.प. सदस्य नामदेव भड, शरद इंगळे, लाला बोदडे ,प्रमोद इंगळे, उत्तम निकम, स्वप्नील निकम, महेंद्र निकम, हिरा बोदडे आदींसह महिलांनी आग विझवली. ईश्वर रहाणे यांनी तत्काळ मुक्ताईनगरला तहसीलदारांंना कळवले. तलाठी आर.एम. वाघ व कोतवाल बाळू कोळी येऊन पंचनामा केला. पंचनाम्यावर ईश्वर रहाणे, शांताराम निकम यांच्या सह्या आहेत. पोलीस पाटील स्नेहल प्रदीप काळे यांनी माहिती कळवली.आगीत ज्वारी, मका, कडधान्य खाण्याच्या वस्तूंसह जीवनावश्यक वस्तू, भांडी, घरावरील पत्रे जळून खाक झाले. घरी लहान मुले होती. सुदैवाने जीवित हानी टळली. मोठा अनर्थ टळला. आजूबाजूलाही घरे होती.हरताळे येथे दरवर्षी उन्हाळ्यात आग लागते,. पंचनामा केला जातो. परंतु लाभार्थीला अद्याप कोणतीच मदत मिळत नाही. केवळ पंचानाम्याचा फार्स होत असल्याचा आरोप ईश्वर रहाणे यांनी केला.दरम्यान, तालुक्यात कोठे आग लागली असता अग्निशमन दलाची कोणतीच सुविधा उपलब्ध नाही. आपद्ग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. गेल्यावर्षीदेखील एका शेतकº्याच्या खळ्याला आग लागून चारा जळला होता. मात्र अद्यापही कोणतीच नुकसानभरपाई मिळाली नाही.
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथे घराला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 8:15 PM
समाज मंदिरासमोरच असलेल्या बारेलाल अहिरलाल अहिरवार यांच्या घराला बुधवारी दुपारी पावणे दोनला अचानक आग लागून त्यात धान्य, जीवनावश्यक वस्तू ,कपडे जळून खाक झाले.
ठळक मुद्देसंसारोपयोगी वस्तू जळून खाकजीवित हानी टळलीनुकसानभरपाईची मागणी