शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
2
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
4
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
5
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
6
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
7
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
8
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
9
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
10
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
11
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
12
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
13
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
14
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
15
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
16
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
17
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
18
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
19
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
20
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान

मुक्ताई सूतगिरणी परिसरात आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 8:27 PM

मानेगाव शेती शिवारात मुक्ताई सूतगिरणी परिसरात गवताला आग लागली.

ठळक मुद्दे कोणतेही नुकसान नाहीवरणगाव फॅक्टरीतील अग्निशमन दलाच्या तत्परतेने टळली हानी

मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील मानेगाव शेती शिवारात मुक्ताई सूतगिरणी परिसरात गवताला आग लागली. यात सूतगिरणीला कोणतीही हानी झाली नाही. शनिवारी दुपारी तीनला ही घटना घडली.सूतगिरणी शेजारी असलेल्या शेतीच्या बांधावरील काडी, कचरा शेतकऱ्याने पेटवला होता. यावेळी हवेचा वेग वाढल्याने जळालेले काही अवशेष मुक्ताई सूतगिरणीच्या आवारात असलेल्या गवतामध्ये जाऊन पडले. यातूनच गिरणीच्या आवाराला अचानक आग लागली. जवळपास अर्धा तास ही आग सुरू होती. यात परिसरातील गवत जळाले. हा प्रकार शेतकऱ्यांच्या व सूत गिरणीत असलेल्या कर्मचाºयांच्या लक्षात येताच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी तत्काळ वरणगाव फॅक्टरीतील अग्निशमन दलाला फोन केले. तीन वाजून वीस मिनिटांनी घटनेची माहिती मिळताच वरणगाव आॅर्डनन्स फॅक्टरीतील अग्निशमन दलाने केवळ दहा मिनिटात घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलातील कार्यरक्षक व्ही.व्ही.कांबळे, अग्नी मार्गदर्शक डी.व्ही.पाटील, डी.पी.वानखेडे, ए.व्ही.बाळापूरकर, पी.व्ही.कुलकर्णी, एन.आर.वारके व एस.टी.जोहरे या अग्निशमन दलातील पथकाने कार्यतत्परता दाखवली. अन्यथा मोठी हानी झाली असती.दरम्यान, आगीची घटना कळताच घटनास्थळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, अ‍ॅड.रोहिणी खडसे, बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, नगराध्यक्ष नाजमा तडवी, भाजपचे सरचिटणीस संदीप देशमुख, योगेश कोलते, सुभाष पाटील, धनंजय एदलाबादकर, सुनील काटे व संचालक मंडळाने घटनास्थळी धाव घेतली. 

टॅग्स :fireआगMuktainagarमुक्ताईनगर