शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

तामसवाडीत घराला आग, संसार उघडय़ावर

By admin | Published: May 06, 2017 12:50 AM

रावेर : बकरी होरपळून ठार, म्हैस व बकरी गंभीर जखमी, रोकडसह अन्नधान्य खाक

लोकमत न्यूज नेटवर्करावेर : तालुक्यातील तामसवाडी येथे मोरगाव रस्त्यावर घर बांधकामासाठी रस्त्यापलीकडे तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या एका टपरीस व त्या पाठीमागे असलेल्या बांबूच्या जाळींना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीने उग्र रूप धारण केल्याने त्यात टपरी बाहेर बांधलेली एक बकरी होरपळून जागीच ठार झाली. ग्रामस्थांसह  लग्नव:हाडी घटनास्थळी धावून आल्याने त्यांनी आगीत होरपळून गंभीर जखमी झालेली म्हैस व बकरीचे दावे तोडून आगीच्या ज्वाळांमधून बाहेर काढले.   टप:यातील गहू, तांदूळ, ज्वारी, सिमेंटच्या गोण्या, कपडे लत्ते, संसारोपयोगी भांडी कुंडी व जीवनावश्यक वस्तूंसह रोख 40 हजार रुपयांची रोकड आगीत भस्मसात झाली. न.पा.च्या अगिAशमन दलाच्या दोन बंबांनी आग नियंत्रणात आणली. तामसवाडी येथील पुंडलिक सीताराम रायमळे यांचे मोरगाव रस्त्यालगत घर बांधकाम सुरू असल्याने त्यांनी त्याच रस्त्यापलीकडच्या बाजूला एक तात्पुरते टपरे उभारले होते. त्या टप:यात संसारोपयोगी भांडी-कुंडी, अन्नधान्य, बांधकामाचे 90 गोण्या सिमेंट, अंथरूण - पांघरूण, कपडेलत्ते व जीवनावश्यक वस्तूंसह सर्व सामान त्यात साठवून ठेवला होता. दरम्यान, आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अति उष्म्यामुळे सदरच्या टप:यास व त्यामागील शेताच्या बांधावरील बाबूंच्या जाळ्यांना लागलेल्या आगीने रुद्रावतार धारण केल्याने सदरच्या आगीत टप:याबाहेर बांधलेली एक बकरी   होरपळून जागीच ठार झाली. या वेळी लग्न व:हाडातून धावून आलेल्या व ङोंडू माधव महाजन (रा.कुसुंबा खु.।।, ता.रावेर) व तामसवाडी येथील किराणा दुकानदार गोकूळ प्रभाकर महाजन यांनी जिवाची पर्वा न करता आगीच्या लोटांमध्येच थेट  उडी घेऊन टप:याबाहेर दावणीला बांधलेल्या साधारणत: सात/आठ वर्षाची गाभण म्हैस व बकरीचे दावे बख्खीने कापून सुखरूप बाहेर काढले. पण गाभण म्हैस व बकरी होरपळून 60 टक्के जळाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, त्याप्रसंगी गावातून मदतीचा हात देण्यासाठी आलेल्या तरुणाईने त्या टप:याच्या दोन्ही बाजूंनी रस्त्याच्या कडेला दावणीला बांधलेल्या व्यापा:यांचे  तब्बल 28 बैल सुखरूपपणे दावे तोडून वाचवल्याने मोठी जीवितहानी टळल्याचे सरपंच सुनील तडवी यांनी स्पष्ट केले.   न.पा.च्या दोन अग्निशमन बंबांच्या साहाय्याने कर्मचारी विजय महाजन, मुबारक तडवी व तायडे यांनी आग नियंत्रणात आणली. त्यात एक बकरी,   टप:यातील दोन क्विंटल गहू, 50 किलो तांदूळ, 50 किलो ज्वारी, सिमेंटच्या 90 गोण्या, कपडे लत्ते, अंथरूण पांघरूण, संसारोपयोगी भांडी कुंडी व जीवनावश्यक वस्तूंसह रोख 40  रुपयांची रोकड  भस्मसात                झाले. तलाठी  बी.जी. तिडके, ग्रामसेविका यू.आर. नाईक यांनी सरपंच सुनील तडवी,  पोलीस पाटील अरुण पाटील यांच्या समक्ष पंचनामा केला.