डोंगर कठोरा, ता.यावल, जि.जळगाव : येथील खालचे गावातील भरवस्तीतील खुशाल हरचंद सोनवणे व पिंटू छगन कुंभार यांच्या घरांना आग लागून घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. यामुळे दोन्ही कुटुंबांचे संसार उघड्यावर आले असून, या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली.खुशाल सोनवणे व पिंटू कुंभार हे गरीब कुटुंब नेहमीप्रमाणे मजुरीसाठी शेतात गेलेले होते. त्यांची मुलेही शाळेत गेलेली होती. वाड्यातील लोकांना दुपारी एक वाजेच्या दरम्यान घरातून अचानक धूर बाहेर निघताना दिसला. तत्काळ गावातील स्वामिनारायण मंदिरातील भोंगा तीन वेळा वाजविण्यात आला. तेव्हा ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले आणि आग विझवण्यात यश मिळाले. या दरम्यान तातडीने घरातील गॅस सिलिंडर तरुणांनी बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घरातील चुल्याजवळील अंथरुणाने पेट घेतल्यामुळे आग लागली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या आगीत घरातील संसारोपयोगी सर्व वस्तू जळून खाक झाल्या. दोन्ही कुटुंब उघड्यावर आले आहेत.घटनास्थळी उपसरपंच नितीन भिरुड, ग्राम पंचायत सदस्य रत्नदीप सोनवणे, इच्छाराम वाघ, तलाठी कुंदन जाधव तसेच तरुण व ग्रामस्थांनी सहकार्य केले.
डोंगर कठोरा येथे भरवस्तीतील दोन घरांना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 6:44 PM
डोंगर कठोरा, ता. यावल , जि.जळगाव : येथील खालचे गावातील भरवस्तीतील खुशाल हरचंद सोनवणे व पिंटू छगन कुंभार यांच्या घरांना आग लागून घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. यामुळे दोन्ही कुटुंबांचे संसार उघड्यावर आले असून, या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली.खुशाल सोनवणे व पिंटू कुंभार हे गरीब कुटुंब नेहमीप्रमाणे मजुरीसाठी शेतात ...
ठळक मुद्देग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळलासुदैवाने जीवितहानी टळलीघरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक, संसार उघड्यावरगावात आग लागल्यास तीन वेळा भोंगा वाजवण्याची प्रथा