भुसावळ : दीपनगर येथील राखेचे ठेकेदार मुकेश तिवारी यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. झटापटीत एक गोळी बाहेर पडली . ही घटना गुरुवार रोजी सकाळी १० वाजून ४० मिनिटांच्या सुमारास घडली असून या प्रकाराने खळबळ उडाली आहे. व्यावसायिक वादातून ही घटना घडली असल्याचे सांगण्यात आले . पोलिसांनी या प्रकारात एका आरोपीस ताब्यात घेतले आहे .दरम्यान, गेल्या महिनाभरापूर्वी दीपनगर गेट समोर समोर हॉटेल त्रिमूर्ती नजीक गोळीबार झाला होता. तर रविवारी रात्री शहरात झालेल्या गोळीबारात पाच लोकांची हत्या करण्यात आली.लक्षात येऊ नये म्हणून फोडले फटाकेसंशयित आरोपी दिपक मधुकर हाताले ( वय ३८ ) हा काही साथीदारांसह ठेकेदार मुकेश शैलेंद्र तिवारी यांच्या दीपनगर येथील निवास्थानी सकाळी १० वाजून ३० मिनिटांच्या दरम्यान आला होता. यावेळी त्यांनी घराच्या मागील बाजूस फटाक्यांची आतषबाजी केली. तर हातेले हा तिवारी यांच्या घरात शिरला. व त्यांच्या डोक्याला बंदूक लावली . यावेळी तिवारी व हताले यांच्यात झटापट झाली . याच दरम्यान पिस्तुलातून एक गोळी उडाली. झटापटी मध्ये पिस्तुल खाली पडले. त्यामुळे तिवारी यांचा प्राण वाचला. पोलिसांनी दीपक हाताले यास ताब्यात घेतले आहे. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .घटनास्थळी डीवायएसपी गजानन राठोड पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व सहाय्यक पोलीस निरीक्षक, कर्मचारी व अधिकारी दाखल झाले . या घटनेमुळे पुन्हा दिपनगरसह शहरात एकच खळबळ उडाली .
दिपनगरमध्ये पुन्हा गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 4:52 PM