ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.26 - गोळीबार करीत दहशत निर्माण करणा:या गुन्हेगारांचा जिल्हाभरात कसून शोध घेण्यात येत आहे. सोमवारी अपर पोलीस अधीक्षक बच्चनसिंग यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
शहरातील भारत नगरसह पवन नगरात पोलीस दप्तरी हद्दपार असलेल्या व गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या सहा आरोपींनी दहशत निर्माण करीत गावठी कट्टय़ातून चार फैरी हवेत झाडल्या होत्या. एक गोळी लागल्याने जुना सातारा, कृष्णा ट्रेडसमागील रहिवासी व अभियंता निखील किशोर झांबरे (वय 24) हे गंभीर जखमी झाले होते. तसेच त्यांना सोडवण्यासाठी धावून आलेला त्यांचा भाऊ सुमीत किशोर झांबरे (वय 20) यासही खंजर मारल्याने तो जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली होती़ या घटनेनंतर आरोपींच्या शोधासाठी शहर पोलिसांचे दोन पथक जिल्हाभरात रवाना झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली़
दरम्यान, या गुन्ह्या प्रकरणी सुमीत झांबरे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून संशयीत आरोपी गौरव बढे, मुकेश भालेराव, राणू बॉक्सर व त्यांच्या सोबतच्या अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े महात्मा फुले नगरात गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून ़7 एमएम आकाराची बंदुकीची रिकामी पुंगळी जप्त केली आह़े या भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आह़े सोमवारी सकाळी अपर पोलीस अधीक्षक बच्चनसिंग तसेच स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
संशयीतावर यापूर्वीदेखील अनेक गुन्हे
भुसावळात गोळीबार करणा:या मुकेश प्रकाश भालेराव या अट्टल आरोपीविरुद्ध जळगावच्या शनिपेठसह भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आह़े आरोपीसोबतचे अन्य साथीदारही पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितल़े