जळगाव : जैन भगवती दीक्षा घेत असलेल्या मुमुक्षू सुश्री चेतना लुंकड यांनी १ रोजी आपल्या सांसरीक जीवनातील अखेरचे व दादावाडीतील मतदान केंद्रावर आज सर्वात पहिले मतदान करून जळगावकरांचा निरोप घेतला.राजेंद्र लुंकड यांची कन्या मुमुक्षू सुश्री चेतना लुंकड या आचार्य रामलालजी म.सा. यांच्या प्रमुख उपस्थितीत ४ आॅगस्ट रोजी जैन दीक्षा घेणार असून त्या निमित्त आयोजित जैन भगवती दीक्षा महोत्सवात बुधवारी विदाई सोहळा झाला. तत्पूर्वी दादावाडी परिसरातील पंचायती मंदिर येथील मतदान केंद्र क्रमांक ९ वर मुमुक्षू सुश्री चेतना लुंकड यांनी सकाळी ७.३५ वाजता आपल्या सांसरीक जीवनातील अखेरचे मतदान केले. सकाळी १० वाजता जुन्या महामार्गावरील महाराष्ट्र तोल काटा मैदानावर सकल जैन संघाच्या सान्निध्यात विदाई सोहळा झाला. संघपती दलुभाऊ जैन, मूर्तीपूजक संघाचे सदस्य दिलीप गांधी, प्रदीप मुथा, अनिल देसर्डा, वसंत सुराणा, धर्मेंद्र बोरा, जैन महिला मंडळाच्या विजया मल्हारा, ममता कांकरिया, समता युवक मंडळाचे सदस्य यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. मुमुक्षू सुश्री चेतना लुंकड यांच्या कुटुंबीयांना व्यासपीठावर बसवून जैन श्रद्धा महिला मंडळाच्या सदस्यांनी विदाई गीत सादर केले. अत्यंत भावनिक वातावरणात त्यांना निरोप देण्यात आला व त्या ११.४० वाजता रतलामकडे वाहनाने रवाना झाल्या. रतलाम येथे विविध कार्यक्रम होणार असून ३ रोजी शोभायात्रा, अभिनंदन सोहळा, वीरा बधाई व ४ आॅगस्ट रोजी दीक्षा सोहळा होणार आहे.
मुमुक्षू सुश्री चेतना लुंकड यांचे पहिले अन् शेवटचे मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 1:35 PM
भावनिक विदाई
ठळक मुद्देउद्या रतलाम येथे शोभायात्रा, अभिनंदन सोहळासांसरीक जीवनातील अखेरचे मतदान