जळगाव- शासकीय रेखाकला परीक्षा अर्थात एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा बुधवारपासून प्रांरभ झाली़ पहिल्या दिवशी शहरातील पाच केंद्रांवर २३०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर १६९ विद्यार्थ्यांनी दांडी मारली़ दरम्यान, सकाळपासून चित्रकला प्रेमी विद्यार्थ्यांनी केंद्र आवाराबाहेर गर्दी केलेली होती़शासकीय रेखाकला परीक्षा ही सप्टेंबर महिन्यात होणार होती़ त्यानुसार सीलबंद प्रश्नपत्रिका वितरणाचे कामही सुरू करण्यात आले होते़मात्र, तांत्रिक अडचणीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली़ त्यानंतर नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आल्यानंतर बुधवारी या परीक्षेला सुरूवात झाली़ शहरातील का़उक़ोल्हे विद्यालय, ए़टी़झांबरे, ला़ना़ विद्यालय तसेच विद्यानिकेतन विद्यालय तसेच प़ऩलुंकड कन्या शाळा या परीक्षा केंद्रांवर परीक्षा प्रारंभ झाली असून पहिल्या दिवशी एलिमेंटरी ग्रेड परीक्षा घेण्यात आली़ त्यामध्ये सकाळी १०़३० वाजता वस्तुचित्र विषयावर तर दुपारी २ वाजता स्मरणचित्र विषयावर परीक्षा झाली़ त्यामुळे सकाळपासून चित्रकलाप्रेमी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांबाहेर पालकांसह गर्दी केलेली होती़ आॅनलाइन अर्ज केलेल्या २३६९ विद्यार्थ्यांपैकी बुधवारी पहिल्या दिवशी २३०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़
पहिल्या दिवशी २३०० हजर तर १६९ विद्यार्थ्यांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 9:58 PM