कोरोनामुळे १ मे पासून कडक लॉकडाऊन करण्यात आल्याने, एसटी महामंडळाची सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद होती. फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच काही तालुक्यांना बसेस सोडण्यात येत होत्या. कोरोनामुळे महामंडळाची ९० टक्के सेवा बंद असल्यामुळे एकट्या जळगाव विभागाचे १८ कोटींच्या घरात आर्थिक नुकसान झाले. मात्र, १ जूनपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता उठविण्यात आल्यामुळे महामंडळातर्फे मंगळवारपासून पुन्हा सेवा सुरू केली आहे. मंगळवारी सकाळी जळगाव आगारातून नाशिक, औरंगाबाद, धुळे यासह चाळीसगाव, पाचोरा,जामनेर, यावल, रावेर या तालुका स्तरावरील फेऱ्याही वाढविण्यात आल्या. यामध्ये सकाळच्या सत्रात प्रवाशांचा बऱ्यापैकी प्रतिसाद दिसून आला. दुपारच्या सत्रात मात्र प्रवाशांचा अल्प प्रतिसाद दिसून आला. त्यामुळे दिवसभरात जळगाव, चोपडा, अमळनेर या आगरांनीच ५० हजारांच्या उत्पन्नाचा टप्पा ओलांडला. तर उर्वरित आगारांना ५० हजारांच्या आतच उत्पन्न मिळाले आहे.
इन्फो :
पहिल्या दिवशी आगारनिहाय मिळालेले उत्पन्न
जळगाव : ८७ हजार ६५ रुपये
यावल : ७ हजार ७७ रुपये
चाळीसगाव : ३६ हजार ७११ रुपये
चोपडा : ९१ हजार ४०८ रुपये
अमळनेर :५१ हजार ८४७ रुपये
जामनेर : ३४ हजार ४३४ रुपये
रावेर : २० हजार ५४० रुपये
मुक्ताईनगर : ३१ हजार २०७ रुपये
पाचोरा : ३२ हजार ९८४
भुसावळ : ३४ हजार ३२३
एरंडोल : १३ हजार १९१ रुपये
एकूण उत्पन्न : ४ लाख ४० हजार ७८७ रुपये