वासेफ पटेलभुसावळ : विभागात प्रथम एका महिला कुलीची नियुक्ती करण्यात आली आहे. महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. डॉक्टर, पोलीस, वकील, सैन्यदल असो किंवा राजकारण प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहेत. मात्र नाशिकच्या इंदूबाई वाघ यांची कुली म्हणून नियुक्ती झाल्याने त्या रेल्वेच्याभुसावळ विभागातील पहिल्या महिला कुली ठरल्या आहेत.आजच्या स्पर्धात्मक युगात महिलाही पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. असे एकही क्षेत्र नाही जेथे महिला कार्यरत नाहीत. मात्र रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे ओझे वाहताना आजवर पुरुष कुली आपण पाहिले आहेत. मात्र नाशिक येथील इंदूबाई एकनाथ वाघ यांना कुलीचा बिल्ला क्रमांक ०७ मिळाला आहे. पतीच्या अकाली निधनानंतर इंदूबाई यांच्यावर आभाळ कोसळले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने परिवाराचा गाडा ओढणे कठीण झाले. माहेरची परिस्थितीही बेताचीच होती. पांडुरंग कचरू मानकर हे नाशिक रेल्वे स्थानकावर कुली म्हणून कार्यरत होते. प्रवाशांचे ओझे वाहून मिळालेल्या कमाईतून उदरनिर्वाह करत. मात्र अति श्रम केल्यामुळे वयोमानानुसार त्यांच्याने आता काम केले जात नव्हते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने केलेल्या वैद्यकीय तपासणीत ते अयोग्य ठरले. रेल्वेच्या नियमानुसार वडिलांच्या जागी त्यांची विधवा कन्या इंदूबाई एकनाथ वाघ यांची नियुक्ती करण्यात आली. विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता, मध्य रेल्वेचे भुसावळ आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक युवराज पाटील नेतृत्वात इंदूबाई यांची नाशिक रेल्वे स्थानकावर प्रथम महिला कुली म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. वाणिज्य विभागाचे अधीक्षक योगेश नागरे यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांचे स्वागत केले.
भुसावळ विभागात प्रथम महिला कुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 4:00 PM
भुसावळ विभागात प्रथम एका महिला कुलीची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्देप्रथम कुलीचा मान मिळाला इंदूबाई वाघ यांनानाशिक रेल्वे स्थानकावर झाली नियुक्तीपतीच्या निधनानंतर रेल्वेने दिला आधार