शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

चोपडा तालुक्यातील पहिला बाधित रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 12:10 PM

अडावद, ता. चोपडा , जि.जळगाव : कोरोना मृतकाच्या संपर्कात आल्याने अडावद येथील ५८ वर्षीय इसम कोरोना पॉझिटिव्ह आला होता. ...

अडावद, ता.चोपडा, जि.जळगाव : कोरोना मृतकाच्या संपर्कात आल्याने अडावद येथील ५८ वर्षीय इसम कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यावर चोपडा येथील कोविड केअर सेंटरला औषधोपचार सुरू होते. तब्बल १४ दिवसांनी दि.१६ रोजी त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने त्यास घरी सोडले. ते चोपडा तालुक्यातील बरे झालेले पहिले रुग्ण ठरले आहेत.येथील कामधेनू दूध डेअरी परिसरातील ५५ वर्षीय इसमाचा दि.२८ रोजी मृत्यू झाला होता. त्याचा दि.३० रोजी कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याने त्याच्या संपर्कातील येथील ५८ वर्षीय इसमही कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्याच्यावर दि.४ पासून चोपडा कोविड सेंटरला औषधोपचार सुरू होते. त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने सायंकाळी घरी सोडण्यात आले. ते चोपडा तालुक्यातील बरे होणारे पहिले रुग्ण ठरले आहेत.येथील कामधेनू दूध डेअरी परिसरातील रहिवासी असलेल्या एका डॉक्टरसह ५५ वर्षीय इसम अशा दोन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर याच परिसरातील दोन तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्यावर चोपडा कोविड केअर सेंटरला औषधोपचार सुरू आहेत.गेल्या काही दिवसापासून आरोग्य विभागाच्या चोपडा येथील कोरोना रुग्णालयाबाबत नानाविध समस्याबाबत तक्रारी कानी येत होत्या. परंतु अशातच एका इसमाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने कोविड सेंटरला मिळालेल्या यशाचे सर्वांनी स्वागत केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याChopdaचोपडा