मुक्ताईनगर : कल्पना इनामदार यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्याच्या आधारे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व त्यांचे पती अनिष दिनेश दमानिया यांच्याविरुद्ध कट कारस्थान व लाचेच्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रयत्न केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात दाखल केलेला गुन्हा (क्वॅश) रद्द करण्यासंदर्भात अंजली दमानिया यांनी औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली होती, त्यावर मंगळवारी झालेल्या सुनावणीत गुन्हा रद्द करण्याचे आदेश न्या. तानाजी नलावडे व न्या.विभाग कनकनवडी यांनी दिले आहेत. यामुळे खडसेंनी दमानियांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात दाखल केलेल्या दोनपैकी पहिला गुन्हा रद्दबातल ठरणार आहे.अण्णा हजारे यांच्या आंदोलनातील सहकारी कल्पना इनामदार यांच्यामार्फत रोकड टेबलवर ठेऊन मला अडकविण्याचे कटकारस्थान समाजसेविका अंजली दमानिया यांनी केल्याचा खुलासा स्वत: इनामदार यांनी ११ एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत केला होता. याआधारे माझ्याविरुद्ध कटकारस्थान व बदनामीचा हेतू बाळगल्याबाबत १९ एप्रिल रोजी मुक्ताईनगर पोलिसात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अंजली दमानियांविरुद्ध फिर्याद दिली होती. लोकसेवकाला फसवण्याचा कट रचणे तसेच सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दमानिया यांच्यासह त्यांचे पती व अन्य सहा ते सात जणांविरुद्ध १९ एप्रिल रोजी मुक्ताईनगर पोलिसात गुरनं.६९/१८, भादंवि ४५१, ४५२, ११६, १२० (ब), १८६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी दमानिया यांनी खंडपीठात धाव घेतली होती. मंगळवारी न्यायासनासमोर याचिकेबाबत सुनावणी झाली. दोन्ही बाजूने युक्तीवाद झाल्यानंतर खडसेंनी दाखल केलेली फिर्याद (क्वॅश) रद्द करण्याचे आदेश न्या.नलावडे यांनी दिले. दमानियांतर्फे अॅड.सतेज जाधव, तर खडसेंतर्फे अॅड.विनायक दीक्षित व सरकार पक्षातर्फे मुख्य सरकारी वकील अमरदीप गिरासे यांनी युक्तीवाद केला. दुसऱ्या एफआयआरची सुनावणी ५ सप्टेबर रोजी होणार आहे.कल्पना इनामदार यांनी वारंवार माझ्याविरुद्ध निखालस खोटे आरोप केले, याचा फायदा घेण्याचा खडसे यांनी प्रयत्न केला, हे वेगवेगळ्या प्रकरणातून न्यायालयासमोर निदर्शनास आणून दिले, अगदी त्यांनी उच्च न्यायालयात माझ्याविरुद्ध दाखल केलेल्या मानहानी दाव्यात खडसेंसंदर्भातील कथित प्रकरणाचा एका अक्षरानेही उल्लेख केला नाही, हेही न्यायालयासमोर लक्षात आणून दिले. याच आधारावर न्यायालयाने गुन्हा रद्दबातल ठरवला. २८ बदनामी खटले, २ फसवणुकीचे गुन्हे व ३ धमक्यांचे प्रकरणे खडसे व समर्थकांनी दाखल केले आहेत. आज सत्याचा विजय झाला आहे. फिर्याद रद्द झाल्याने खूप आनंद झाला.-अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या
अंजली दमानियांविरुद्ध एकनाथराव खडसे यांचा पहिला गुन्हा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:36 PM
औरंगाबाद खंडपीठाचे आदेश
ठळक मुद्देदमानियांना दिलासादुसऱ्या एफआयआरची सुनावणी ५ सप्टेबर रोजी