चाळीसगाव, जि.जळगाव : जीवनावश्यक वस्तू नसतानाही दुकान उघडे ठेवल्याच्या आरोपावरून शहरातील घाट रोडवरील दीपक हेअर पार्लर या सलून दुकानचालकाविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मयूर भामरे, उपविभागीय कार्यालयाचे पोलीस अंमलदार अमोल कुमावत व दिनेश पाटील तसेच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार भटू पाटील, शरद पाटील, महेश बागुल या पथकाने चाळीसगाव पोलीस स्टेशन हद्दीतील घाट रोडवरील दीपक हेअर पार्लर हे सलून दुकान उघडे ठेवले. सलूनच्या या दुकानात पाच जण आढळले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर चाळीसगाव पोलीस स्टेशनला संचारबंदी, जमावबंदी, जीवनावश्यक वस्तू नसताना हेअर पार्लर उघडे ठेवून, वापर करणे व आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल केलेल्यात दीपक प्रल्हाद शिंदे (वय ५१, रा.शास्त्री नगर), प्रद्युम दीपक शिंदे (वय २१, रा.शास्त्रीनगर), कैलास बाबूलाल येवला (वय ४७, रा.महादेव आश्रम लॉजजवळ), सौरभ आनंदा कोळी (वय २२, रा.घाट रोड), अजय नीलकंठ गुरव (वय २६, रा.सुवर्णानगर) यांचा समावेश आहे.विनाकारण घराबाहेर न पडण्याचे व जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापना वगळता इतर दुकाने खुली न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
चाळीसगावात सलून पार्लरवर पहिला गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 8:57 PM
जीवनावश्यक वस्तू नसतानाही दुकान उघडे ठेवल्याच्या आरोपावरून शहरातील घाट रोडवरील दीपक हेअर पार्लर या सलून दुकानचालकाविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देजीवनावश्यक वस्तू नसताना दुकान ठेवले उघडेपाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल