शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
3
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
4
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
5
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू
6
चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर
7
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
8
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
9
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
10
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
11
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
12
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
13
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
14
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
15
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
16
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
17
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
19
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
20
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार

जामनेर येथे पहिले राज्यस्तरीय तावडी बोली मराठी साहित्य संमेलन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 1:44 AM

पहिल्या राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलनास रविवारी सकाळी ग्रंथ दिंडीने सुरुवात झाली. पालिका कार्यालयापासून निघालेल्या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक उपस्थित होते.

ठळक मुद्देसंमेलनातील ग्रंथ दिंडीने वेधले जामनेरकरांचे लक्ष‘तावडी रत्न’ पुरस्कार मिळालेल्या आठ जणांचा सन्मानविविध साहित्यिकांच्या पुस्तकांचे झाले थाटात प्रकाशन

जामनेर, जि.जळगाव : पहिल्या राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलनास रविवारी सकाळी ग्रंथ दिंडीने सुरुवात झाली. पालिका कार्यालयापासून निघालेल्या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक उपस्थित होते.ग्रंथदिंडीत अग्रभागी संत गाडगेबाबांच्या वेशातील कार्यकर्ता रस्ता सफाई करीत होता. बैलगाडीवर बसलेली अस्मिता चौधरी ही बहिणाबाईच्या वेषात जात्यावर दळण दळत होती. दिंडीतील पालखीत ठेवलेल्या ग्रंथाचे व संविधानाचे पूजन नगरसेविका संध्या पाटील व जितेंद्र पाटील यांनी केले. दिंडीत न्यूू इंग्लिश स्कूल, बोहरा सेंट्रल, एकलव्य प्राथमिक, ज्ञानगंगा, खादगाव जि.प. शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. दिंडीत दीपक पाटील, नाना लामखेडे, सुधाकर माळी, डॉ. प्रशांत भोंडे, जितू गोरे, चंद्ररकांत मोरे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. स्वातंत्र सेनानींच्या वेशभूषेतील विद्यार्थी लक्ष वेधून घेत होते. ग्रंथ दिंडीच्या सुरुवातीला संमेलनाध्यक्ष गो.तु.पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. दिंडीत घोड्यावर बसलेल्या पारंपपरिक पोषाख घातलेल्या मुली लक्ष वेधून घेत होत्या.लोकजागर व गोंधळतावडी बोली साहित्य संमेलनात उद्घाटन सत्रानंतर लोकजागर व गोंधळ हा पारंपरिक कार्यक्रम सादर करण्यात आला. तळेगाव, ता.जामनेर येथील जय वाल्मीकी जनजागरण कलापथक मंडळाचे सदस्य अर्जुन कोळी, राहुल मगरे, नितीन कोळी, पंकज चौधरी, किरण कोळी, देवानंद कोळी यांनी लोकगीत सादर केले.सोयगाव, जिल्हा औरंगाबाद येथील जय वाल्मीकी पचरंग कलापथक मंडळातील योगेश साळवे, दिनेश निकम, शिवाजी अस्वार, गणेश इंगळे, प्रभाकर राऊत व प्रभाकर धनगर यांनी लावणी सादर केली.‘तावडी रत्नां’चा सत्कारतावडी बोली साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात पद्ममश्री ना.धों.महानोर व संमेलनाध्यक्ष गो.तु.पाटील यांच्या हस्ते ‘तावडी रत्न’ जाहीर झालेल्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात एकनाथ देशमुख, मधुकर पांढरे, दिलीप देशपांडे, रवींद्र पांढरे, बद्रीप्रसाद शर्मा, शिवदास पाटील, विठ्ठल काळे, रमेश महाजन यांना स्मृतीचिन्ह, शाल देऊन सन्मानित करण्यात आले.या पुस्तकांचे झाले प्रकाशनसाहित्य संमेलनात डॉ.अशोक कौतिक कोळी यांचे तावडी बोली, डॉ.प्रकाश सपकाळे यांचे तावडी माटी, प्रमोद पिवटे यांचे पंचायत व गजानन कुलकर्णी यांचे गंधवेड्या लहरी या पुस्तकांचे प्रकाशन महानोर यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवरांनी केले.परिसंवादात आली रंगतसाहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘तावडी बोली : महाराष्ट्रातील प्रमुख बोलीभाषा’ या विषयावर झालेल्या वक्त्यांनी रंगत आणली.परिसंवादात डॉ.शशिकांत पाटील (जालना), प्रा.डॉ.नितीन दांडेकर (एरंडोल), प्रा.डॉ.संदीप माळी (जामनेर), प्रा.समाधान पाटील (भुसावळ), प्रा.गणेश सूर्यवंशी (जळगाव), प्रा.किरण पाटील (जामनेर) यांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी नाहाटा महाविद्यालयातील प्रा.डॉ. प्रकाश सपकाळ होते. प्रा.पुरुषोत्ततम महाजन यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. अक्षय घोरपडे यांनी आभार मानले.

टॅग्स :literatureसाहित्यJamnerजामनेर