जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने गुरूवारपासून मुळजी जेठा महाविद्यालयात दोन दिवसीय पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन रंगणार आहे.विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव दिल्यानंतर या प्रकारचे हे पहिलेच संमेलन होत आहे. खान्देश कॉलेज आॅफ एज्युकेशन सोसायटी या अमृत महोत्सवी वर्षात वाटचाल करणाऱ्या संस्थेच्या मुळजी जेठा महाविद्यालयातील बहिणाबाई साहित्य नगरीत हे संमेलन होत आहे.गुरुवार, दि.३ आॅक्टोबर रोजी सकाळी ८:३० वाजता काव्यरत्नावली चौक ते मु.जे.महाविद्यालय अशी ग्रंथदिंडी निघणार आहे. सकाळी १० वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील राहतील. प्रमुख अतिथी म्हणून सिनेअभिनेता राहूल सोलापूरकर व केसीईचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार बेंडाळे असणार आहेत. सकाळी ११ वाजता राहूल सोलापूरकर यांच्याशी मुक्तसंवाद होईल. त्यानंतर दुपारी १ वाजता साहित्य संवाद अंतर्गत मान्यवर साहित्यिक हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून चांगले लिखाण असणा?्या व सादरीकरण करणाºया विद्यार्थ्यांची निवड करतील. सायंकाळी ५ वाजता खान्देशची लोकधारा अंतर्गत माहेरी आल्या बहिणाई हा कार्यक्रम होणार असून त्यामध्ये बोलीभाषेतील गाणी, उखाणे सादर केले जातील. रात्री ८:३० वाजता बालकवी ठोंबरे काव्यमंचावर कवीसंमेलन होईल अशी माहिती विद्यापीठाच्यावतीने देण्यात आली.
गुरूवारपासून जळगावात रंगणार पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 1:11 PM