जळगाव : दहावी परीक्षेचा निकाल जिल्ह्याचा टक्का तब्बल १६़५९ ने वाढला आहे. दहावीच्या निकालाचा आलेख गेल्या ४ वर्षानंतर प्रथमच उच्चांकावर पोहचला आहे. बग़ो़शानभाग विद्यालयाची समीक्षा विजय लुल्हे ही विद्यार्थिनी ९९़८० टक्के मिळवून जिल्ह्यात अव्वल ठरली तर नंदिनीबाई वामनराव मुलींच्या विद्यालयातील महेश्वरी दीपक नारखेडे हिला ९९़६० टक्के मिळाले आहेत.
यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी वाढली असली तरी जिल्हा नाशिक विभागात तिसऱ्या स्थानी राहिला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्याचा निकाल ७६़९२ टक्के इतका तर यंदा ९३.५१ टक्के निकाल लागला आहे.दहावीचा निकाल बुधवारी आॅनलाईन जाहीर झाला. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून ५९ हजार ७१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यात ३३ हजार ७५१ मुले तर २५ हजार ३२० मुली होत्या. त्यापैकी ५५ हजार २४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ३१ हजार ८४ मुले तर २४ हजार १५६ मुली आहेत. मुलांच्या निकालाची टक्केवारी ९२़१० तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५़४० इतकी आहे. मुलांच्या तुलनेत मुलींच्या निकालाची टक्केवारी ३़३० ने अधिक असून, मुलींनी पुन्हा एकदा मुलांपेक्षा आम्हीच हुशार असल्याचे दाखवून दिले आहे. यावर्षी जळगाव जिल्ह्यात १३४ परीक्षा केंद्र होती.शानभागची हॅट्ट्रीकदहावी निकालात शानभाग विद्यालयाची ‘हॅट्ट्रीक’ झाली असून २०१८ मध्ये विशाखा कुलकर्णी या विद्यार्थिनीनंतर २०१९ मध्ये प्रज्ज्वल पाटील आणि आता समीक्षा लुल्हे ही ९९़८० टक्के मिळवून अव्वल ठरली आहे़२१ हजार विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्णजिल्ह्यातून यावर्षी १९ हजार २७० विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे, २१ हजार २५२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १२ हजार २२३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २ हजार ४९५ विद्यार्थी हे पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.अंतर्गत मूल्यमापन, तोंडीपरीक्षा, कृतीपत्रिका आणि भूगोल विषयाचे मिळालेले सरासरी गुण या प्रमुख कारणांमुळे यावर्षी निकालाची टक्केवारी वाढली असावी, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.२१ हजार विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्णजिल्ह्यातून यावर्षी १९ हजार २७० विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे, २१ हजार २५२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १२ हजार २२३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २ हजार ४९५ विद्यार्थी हे पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.अंतर्गत मूल्यमापन, तोंडीपरीक्षा, कृतीपत्रिका आणि भूगोल विषयाचे मिळालेले सरासरी गुण या प्रमुख कारणांमुळे यावर्षी निकालाची टक्केवारी वाढली असावी, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.कॉपी प्रकरणात घटजळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी तब्बल १४८ कॉपीबहादरांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र यंदा कॉपी प्रकरणात घट होवून फक्त ३८ विद्यार्थ्यांवर कारवाई झाली आहे. सर्वाधिक कारवाई नंदुरबार जिल्ह्यातील ४० विद्यार्थ्यांवर झाली आहे.गुण पडताळणीसाठी ८ आॅगष्टपर्यंत मुदतदहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपळताळणीसाठी ३० जुुलैपासून ८ आॅगष्टपर्यंत मुदत देण्यात आली असून छायाप्रतीसाठी देखील १८ आॅगष्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे.