आकाश नेवेजळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशासाठी निधी कसा उभारला, यावर जळगावातील गांधी रिसर्च फाऊंडेशनमधील डाॅ. अश्विन झाला व निर्मला झाला यांनी संशोधन करीत पीएचडी मिळविली आहे.
अश्विन झाला हे २०१० मध्ये जळगावला आले. त्यावेळी जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्व. भवरलाल जैन यांनी झाला दाम्पत्याला या विषयावर पीएचडी करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. हे संशोधन सप्टेंबर २०१९ मध्ये विद्यापीठात सादर करीत त्याची मुलाखत नोव्हेंबर २०२० मध्ये झाली.
अश्विन झाला हे भावनगरच्या एमएसडब्लू महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पत्नी संशोधनासाठी जळगावला आल्या होत्या. सध्या हे दाम्पत्य या ठिकाणी रिसर्च असोसिएट्स आणि संपादक म्हणून काम करत आहे तर निर्मल झाला या ठिकाणी रिसर्च फेलो म्हणून कार्यरत आहेत. महात्मा गांधी यांनी कशा पद्धतीने निधी संकलित केला. कोणत्या कामासाठी केला. त्यातून त्यांनी काय साध्य केले, यावर संशोधन केले आहे. गांधीजी निधी संकलित करताना तो सामान्य माणसांमधून करत असत. बऱ्याचदा ते काही वस्तूंचा लिलाव करीत होते. मानपत्रासोबत आलेल्या लाकडी बॉक्स किंवा गरजच नसलेल्या वस्तूंचा संग्रह करण्यापेक्षा त्याचा लिलाव करून ते निधी संकलित करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वराज्य फंडातून १ कोटी १५ हजार रुपयांचा निधीलंडनमध्ये शिक्षण झाल्यानंतर गांधीजी दक्षिण आफ्रिकेत गेले. त्यावेळी १८९७ मध्ये भारतात मोठा दुष्काळ पडला. त्यांनी नताल इंडियन काँग्रेसची स्थापना केली आणि १४०० पाैंडाचा निधी उभारला आणि कलकत्ता (कोलकाता) येथे भारताच्या व्हाईसरॉयकडे पाठवला होता. त्यांनी १ कोटी १५ हजार रुपयांचा निधी टिळक स्वराज्य फंडातून उभा केला होता, असेही झाला दाम्पत्याने सांगितले.