पहिली लाट ज्येष्ठांच्या तर दुसरी लाट तरूणांच्या जीवावर
जिल्ह्याची स्थिती : बाधित व मृतांमध्ये तरूणांचे प्रमाण अधिक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक भयावह ठरली आहे. आता दुसरी लाट ओसरत असली तरी या लाटेत तरूणांचे बाधित होण्याचे प्रमाण व मृत्यू वाढले, पहिल्या लाटेत हे प्रमाण अगदी नगण्य होते. पहिल्या लाटेत ज्येष्ठांचे अधिक मृत्यू झाले होते. मात्र, दुसऱ्या लाटेत चित्र बदलले. शिवाय बालकांनाही या लाटेत संसर्ग अधिक झाला होता. ० ते १५ वर्ष वयोगटात तब्बल दुपटीपेक्षा अधिक मुलांना दुसऱ्या लाटेत संसर्ग झाला.
पहिली लाट
० ते १५ - ३८७२
१६ ते ३० -१२६५८
३१ ते ४५- १७१००
४६ ते ६०-१३९७०
६१ ते ८०-८८५८
८१ वर -५७६
दुसरी लाट
० ते १५ - ४८५८
१६ ते ३० -१८१४०
३१ ते ४५- २५२७६
४६ ते ६०-२१५८३
६१ ते ८०-११६३०
८१ वर -९२५
मृत्यू
पहिली लाट
० ते १५ - ०१
१६ ते ३० -१८
३१ ते ४५- १०५
४६ ते ६०-४२६
६१ ते ८०-७०४
८१ वर -१०२
दुसरी लाट
० ते १५ - ०४
१६ ते ३० -२५
३१ ते ४५- १६३
४६ ते ६०-३६५
६१ ते ८०-५५६
८१ वर -७५
महिला मृत्यू
पहिली लाट ४०१
दुसरी लाट ३७८
पुरूष मृत्यू
पहिली लाट ९५८
दुसरी लाट ५१७
तिसऱ्या लाटेसाठी तयारी
तिसऱ्या लाटेसाठी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प विविध ठिकाणी उभारले जात आहेत. यासह बालकांच्या खाटा वाढविण्यात आल्या आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १०० बेड उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासह या कक्षांमध्ये व्हेंटीलेटरही वाढविण्यात आले आहेत.
कोट
तिसऱ्या लाटेसाठी मोहाडी रुग्णालयास विविध ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू होणार आहेत. यासह बालकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहेत. मोहाडी रुग्णालयात बेड वाढविण्यात येणार आहे. काही ग्रामीण रुग्णालयांमध्ये बेड वाढविले जात आहेत. प्रशासकीय यंत्रणा तिसऱ्या लाटेसाठी सज्ज आहे. - डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक