ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 25- धरणात मासेमारीसाठी लावण्यात आलेल्या जाळ्य़ात प्रल्हाद ङोंडू भोई (35, मूळ रा. सामरोद, ता.जामनेर) मच्छीमाराचा पाय अडकल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास धरणगाव परिसरात घडली. प्रल्हाद ङोंडू भोई हा सामरोद येथील रहिवासी असून तो फुलफाटा (धरणगाव) येथे कुटुंबियासह वास्तव्यास आहे. प्रल्हाद भोई हा मासेविक्रीचा व्यवसाय करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होता. मासेमारीसाठी धरणावर जातो,असे प}ीला सांगून तो मंगळवारी घराबाहेर पडला. धरणगाव जवळ असलेल्या धरणात प्रल्हाद सोबत गावातील तीन जण मच्छीमारीसाठी गेले. प्रल्हाद मासे पकडत असताना तो टय़ूबवरून सटकल्याने त्याचा तोल गेला. त्यातच पाय मासेमारीच्या जाळ्य़ात अडकला. जाळ्य़ातून पाय काढण्याचा त्याने प्रय} केला, मात्र त्यात त्याला यश आले नाही. त्यामुळे तो पाण्यात बुडाला. दरम्यान हा प्रकार याचठिकाणी मासेमारी करत असलेले रामचंद्र भोई, तुळशीराम भोई यांच्या लक्षात आल्याने त्यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन मदत केली व त्यांच्या मदतीला गावातील इतरही काही जण धावून आले व त्यांनी प्रल्हादला पाण्यातून बाहेर काढले व धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. प्राथमिक उपचार करून अत्यवस्थ असलेल्या प्रल्हादला जळगावला हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिका:यांनी प्रल्हादला मृत घोषीत केले.प्रल्हादच्या पश्चात पत्नी, मुले,मुली तसेच भाऊ, वहिणी असा परिवार आहे.