शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

आईला घोडा म्हटल्याच्या संतापात डोक्यात तलवारीने वार करून एकास उडवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 6:04 PM

शहरातील संभाजीनगर भागात शेजारच्याने आईला घोडा म्हणून हिणवल्याचा राग आल्याने संतापात एकाने थेट तलवारीने डोक्यावर हल्ला करून ठार मारले.

ठळक मुद्देरावेर : शहरातील संभाजीनगर येथील घटनाजीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्ह्यात आरोपीला तीन दिवस कोठडी 

लोकमत न्यूज नेटवर्क

रावेर : शहरातील संभाजीनगर भागात शेजारच्याने आईला घोडा म्हणून हिणवल्याचा राग आल्याने संतापात एकाने थेट तलवारीने डोक्यावर हल्ला करून सोमवारी रात्री जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, आज जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू असताना त्या जखमी इसमाचा मृत्यू झाला असून एकच खळबळ उडाली आहे. रावेर पोलीसात संबंधित आरोपींवरील जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात खुनाच्या कलमाची वाढ करण्यात येणार असून, रावेर न्यायालयाने या आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

रावेर पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील संभाजीनगर भागात वास्तव्यास असलेल्या स्वस्त धान्य दुकानदार तथा गुरांचे व्यापारी राजू देवराम चौधरी (५५) हे आपल्या आईला घोडा बोलून हिणवत असल्याचा राग आल्याने आरोपी रवींद्र संतोष मराठे ( ३५) याने थेट प्राणघातक तलवारीने राजू देवराम चौधरी यांच्या डोक्यात वार करत मेंदूला गंभीर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना सोमवारी रात्री १०: ४५ वाजेच्या सुमारास जखमी राजू देवराम चौधरी यांच्या घरासमोर घडली होती. रक्तबंबाळ झालेल्या जखमी राजू देवराम चौधरी यांच्यावर रावेर ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार करून जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

दरम्यान, जळगाव येथील मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यापुर्वीचं औषधोपचार सुरू असताना जखमी राजू देवराम चौधरी यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खबर आज दुपारी ४ वाजता समजल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

मयताचा भाऊ गणेश देवराम चौधरी रा संभाजीनगर यांनी सोमवारी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीसात आरोपी रवींद्र संतोष मराठे याच्या विरुद्ध भादंवि कलम ३०७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . त्यात जखमी राजू देवराम चौधरी याचा दुर्दैवाने मृत्यू झाला असल्याने सदर आरोपीविरुद्ध थेट भादंवि कलम ३०२ ची वाढ करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी स्पष्ट केले आहे. 

आरोपी रवींद्र संतोष मराठे (३५) यास रावेर पोलीसांनी मंगळवारी पहाटे तीन वाजता अटक करून आज रावेर न्यायालयासमोर हजर केले होते. न्या ए एच बाजड यांनी आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

घटनास्थळी फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, फौजदार मनोज वाघमारे, मनोहर जाधव, अनीस शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला आहे. खुनाच्या वार्तेने शहरात एकच खळबळ उडाली असून संभाजीनगर भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक हे करीत आहेत. 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

चौकट : मयताने सीआरपीएफ जवानाच्या साखरपुड्याचे मारेकर्‍याला दिले होते निमंत्रण

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शहरातील संभाजीनगर भागातील स्वस्त धान्य दुकानदार असलेले राजू देवराम चौधरी व त्यांचा मारेकरी असलेला आरोपी रवींद्र संतोष मराठे हे भिंतीलगतचे शेजारी आहेत. आरोपी रवींद्र हा वीज कंत्राटदाराकडे रोजंदारीवर कामे करतो. दरम्यान, मयत राजू चौधरी यांचा केंद्रीय राखीव पोलीस दलात सेवारत असलेला जवान भुषण यांच्या येत्या बुधवारी असलेल्या साखरपुड्याचे निमंत्रणही दिले होते. मात्र, सोमवारी झालेल्या वादातून ही खुनाची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. मयत राजू चौधरी यांच्यावर रात्री ७ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले सुना, मुलगी असा परिवार आहे. 

 

 

टॅग्स :JalgaonजळगावRaverरावेरCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू