अडावद : येथे जिल्हा परिषदेने शासनाच्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत पाच अंगणवाडय़ांचे बांधकाम केले. यासाठी शासनाचा सुमारे 30 लाख रुपयांचा निधी खर्च झाला. अंगणवाडय़ांच्या नवीन खोल्यांचे बांधकाम होऊन दीडवर्ष झाले. मात्र त्यांचे हस्तांतरण रखडल्याने, या अंगणवाडय़ा धूळखात बंद पडल्या आहेत. परिणामी आजही काही अंगणवाडय़ा उघडय़ावर भरत आहे.येथे शासनाच्या महिला, बालविकास प्रकल्पांतर्गत 27 नियमित तर दोन मिनी अंगणवाडय़ा सुरू असतात. दिवसेंदिवस गावाचा विस्तार होत असल्याने सोयीनुसार ठिकठिकाणी अंगणवाडी भरते. त्यासाठी त्या, त्या परिसरातील अंगणवाडी सेविका, मदतनीस अंगणवाडी चालवित असतात. यात प्रामुख्याने 17 इमारती अंगणवाडय़ांसाठी उपलब्ध असून तेथे 17 अंगणवाडय़ा भरतात. सात अंगणवाडय़ा भाडे तत्त्वावर घेतलेल्या इमारतीत भरतात. तीन अंगणवाडय़ा टपरीच्या ठिकाणी तर एक सध्या पाणीपुरवठा कामासाठी असलेल्या खोलीत भरते. एक अंगणवाडी व्हरंडय़ात भरते, अशा सुमारे 29 अंगणवाडय़ा येथे भरतात.येथे जि.प.माध्यमातून मानव विकास कार्यक्रमांतर्गत (सन 2013-14) प्रत्येकी सहा लाख रुपयाप्रमाणे पाच अंगणवाडय़ांचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यात आनंदनगर, लोखंडे नगर, संभाजीनगर, वनादाजीनगर, प्रमिलानगर याठिकाणांचा समावेश आहे. परंतु बांधकाम होऊन सुमारे दीड वर्षे उलटले तरी अद्याप या अंगणवाडय़ा ग्रामपंचायतीच्या ताब्यात मिळाल्या नाही. त्या बंद अवस्थेतच पडल्या आहेत. काही ठिकाणी या नव्याने बांधण्यात आलेल्या अंगणवाडय़ाच्या खिडक्या नादुरुस्त होऊ लागल्या आहेत. तसेच बांधकामाचेही नुकसान होत आहे. परंतु कुणीही याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे.या अंगणवाडय़ा सुरू व्हाव्या. यासाठी ग्रामस्थांनी दोनवेळा ग्रामसभेत हा विषय लावून धरला. परंतु काहीही निष्पन्न झाले नाही. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)अंगणवाडय़ातून घेतात 3211 विद्यार्थी शिक्षण या अंगणवाडय़ांच्या माध्यमातून 0 ते 3 वयोगटातील विद्याथ्र्याना पोषण आहार व आरोग्याच्या सुविधा पुरविणे तसेच तीन ते सहा वर्ष वयोगटातील विद्याथ्र्याना शिक्षण, पोषण आहार देण्याचे काम सुरू असते. तब्बल 3211 विद्याथ्र्याना अंगणवाडय़ांच्या माध्यमाने शिक्षण मिळते.अंगणवाडय़ांचे बांधकाम होऊन तब्बल दीड वर्षे झाले तरी त्या उघडण्यात आलेल्या नाहीत. याकडे सर्वाचे दुर्लक्ष झालेले आहे.अंगणवाडय़ांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. हस्तांतरणाबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. परंतु ठेकेदार आजारी असल्याने उशीर झाला. परंतु लवकरच हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून घेऊ.- जयश्री पाटील, जि.प.सदस्या, अडावदसंबंधित ठेकेदाराला वेळोवेळी सूचना देऊन अंगणवाडय़ा हस्तांतरण करण्याचे सांगितले. परंतु हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली नाही.- प्रदीप धनगर, ग्रामविकास अधिकारी, अडावद
पाच अंगणवाडय़ा बंदावस्थेतच
By admin | Published: January 09, 2017 12:47 AM