जळगाव : बांधकाम व्यावसायिंक खुबचंद साहित्या यांच्यावरील हल्ला प्रकरणात भाजप नगरसेवक प्रवीण रामदास कोल्हे (३२, रा.ज्ञानदेव नगर, जळगाव) याच्यासह अटकेतील पाचही संशयितांचे जामीन अर्ज न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावले. जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात व्हीडीओकॉन्फरन्सद्वारे कामकाज झाले.खुबचंद साहित्या यांच्यावर १६ जानेवारी रोजी आरएचएम गोरजाबाई जिमखान्यात प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणी माजी महापौर ललित विजयराव कोल्हे व इतर सात अशा आठ जणांविरुध्द शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा घडल्यापासून ललित कोल्हे फरार आहे. तर ललितचे साथीदार राकेश नंदू आगरिया (२२, रा.वाघ नगर). नीलेश नंदू पाटील (२४, रा.कोल्हे नगर), गणेश अशोक बाविस्कर (२५, रा.तुरखेडा, ) व नरेश नंदू आगरिया (२४, रा.वाघ नगर, जळगाव) या चौघांना अटक झाली होती, त्यानंतर २० एप्रिल रोजी भाजप नगरसेवक प्रवीण रामदास कोल्हे याला अटक झाली होती.सर्वोच्च न्यायालयाचा आधार घेऊन अर्जदेशात कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याने सध्या कारागृहात असलेल्या संशयितांना गुन्ह्याचे स्वरुप पाहून ४५ दिवसांचा अंतरिम जामीन देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. याचा आधार घेऊन या पाच संशयितांनी जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र या गुन्ह्यातील मुख्य संशयित माजी महापौर ललित कोल्हे फरार आहेत. त्याशिवाय गुन्ह्याचे स्वरुप गंभीर असल्याने संशयितांच्या जामिनास सरकार पक्षाने विरोध दर्शविला. त्यानुसार न्यायालयाने अंतरिम जामीन फेटाळले.
भाजप नगरसेवकासह पाच जणांचे जामीन अर्ज फेटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 11:41 AM