भुसावळ (जि.जळगाव) : भुसावळ जक्शनवरील रेल्वे यार्डात मालगाडीचे पाच डबे रूळावरून घसरल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रेल्वे यार्डात हा प्रकार घडला असल्यामुळे कोणत्याही मार्गावरील वाहतुकीस याचा अडथळा झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.भुसावळ रेल्वे स्टेशनच्या यार्डात सकाळी ११ वाजून १३ मिनिटांच्या दरम्यान सिमेंटचे डबे घेऊन एक मालगाडी जात होती. या गाडीचा नंबर एन / जेएल (एन बॉक्स) असा होता. ही जळगाव स्पेशल गाडी यार्डातील अप रिसीवींग लाईन नंबर ५ वरून भुसावळ यार्डातून खांबा क्रमांक १०१३ ते १०२० ते या दरम्यान जात असताना मालगाडीचे सिमेंटने भरलेले पाच डबे रुळावरुन घसरले. गाडी हळू असल्यामुळे केवळ मोठा आवाज झाला. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. मालगाडीवरील ड्रायव्हर व्ही.के. सिंग (भुसावळ) व गार्ड हेमराज सिंह (बडनेरा) कर्तव्यावर होते. त्यांनी तातडीने रेल्वे स्टेशनवरील अधिकाºयांशी संपर्क साधून घटनेविषयी माहिती दिली.मदत पथक पोहोचलेघटनेची माहिती मिळताच रेल्वे विभागाचे अपघात नियंत्रण पथक काही वेळातच या ठिकाणी पाहोचले. त्यांनी तातडीने पाचही डबे पुन्हा ट्रॅकवर आणण्याचे काम सुरू केले. काही अधिकारी वर्गही या ठिकाणी सायंकाळपार्यंत या ठिकाणी होता. अपघाताचे कारण मात्र कोणीही सांगू शकले नाही. रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी कामकाज सुरू होते.
मालगाडीचे पाच डबे घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 1:16 AM