लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात शनिवारी ५ बाधितांचा मृत्यू झाला असून १३३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागातही रुग्ण वाढताना दिसत असून शनिवारी जळगाव ग्रामीणमध्ये ६२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील १२५ तर ग्रामीणमधील ५५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
शहरातील रुग्णसंख्या ३१,५६९ झाली असून ग्रामीणमध्येही ५ हजार १०७ कोरोना बाधितांची संख्या आहेत. यातील अनुक्रमे १५२७ आणि ३९९ सक्रिय रुग्ण आहेत. संपूर्ण जिल्हाभरात रुग्णसंख्येत व मृतांची आकडेवारी ही जळगाव तालुक्यात सर्वाधिक आहे. शनिवारी अन्य दिवसांच्या तुलने निम्म्याच चाचण्या झाल्या आहेत. यात ॲन्टीजन ४५९९ तर आरटीपीसीआरचे २१०१ अहवाल समोर आले असून त्यात २९८ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तर ॲन्टीजन चाचणीत ५७९ रुग्ण समोर आले आहेत. दरम्यान, जळगावसह अन्य काही तालुक्यांमध्येही परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिलासादायक चित्र गेल्या काही दिवसांपासून आहे.
शहरातील ६४ व ९२ वर्षीय पुरूष तसेच ४०, ६३ व ७० वषीय महिला रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. यासह अमळनेर, रावेर तालुक्यात प्रत्येकी २ तर जामनेर, पाचोरा, रावेर, यावल, भुसावळ, मुक्ताईनगर, पारोळा, भडगाव या तालुक्यात प्रत्येकी १ बाधिताच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सक्रिय रुग्ण ९७३५
लक्षणे असलेले रुग्ण २४३७
लक्षणे नसलेले ७२९८
ऑक्सिजनवरील रुग्ण १२६६
आयसीयूतील रुग्ण ७३२