लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कृषी कायद्याला विराेध करीत दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी विविध पाच संघटनांनी ७ ते १२ डिसेंबर दरम्यान, विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येणार आहे. यात माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवशी १२ डिसेंबर रोजी किसान जनआंदोलन दिवस म्हणून पाळला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
भारतीय संविधान बचाव सेना, भारतीय ओडबसम क्रांती, छत्रपती सेना, शहिद टिपू सुलतान सेना, पिपल्स रिपब्लीकन पार्टी यांच्यातर्फे हे आंदोलन होणार आहे. ७ डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता तर ८ डिसेंबरला सकाळी १० वाजता भुसावळ येथे किसान रॅली, १० डिसेंबर रोजी जिल्ह्यातील दहा रेल्वे स्थानकांवर रेल रोको आंदोलन विविध दहा संघटनांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, ११ डिसेंबर रोजी राज्यपालांच्या निवासस्थानी दुपारी २ वाजता किसान मोर्चा आणि १२ डिसेंबर रोजी आझाद मैदान ते सीएसटी रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन होणार आहे. कामगार नेते जगन सोनवेण व भुसावळ येथील नगरसेविका पुष्पा सोनवणे हे मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.