यावल, जि.जळगाव : शहरासह येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच दिवसीय गणेशोत्सवाचे विसर्जन सोमवारी होत आहे. त्यात शहरातील २० व ग्रामीण भागातील २० सार्वजनिक मंडळांचा समोवश आहे.शहरासह नायगाव, कोरपावली, डांभुर्णी, दहिगाव, सौखेडासीम या गावात पाच दिवशीय गणेशोत्वाची परंपरा आहे. शहरात २० सार्वजनिक तर दोन खासगी गणेश मंडळे हा उत्सव साजरा करत आहेत. यासह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव, कोरपावली, सावखेडासीम या गावात ‘एक गाव-एक गणपती’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डांभुर्णी येथे सहा तर दहिगाव येथे आठ गणेशोत्सव मंडळांनी पाच दिवसीय गणेशोत्सव साजरा केला आहे. सोमवारी ४० गणेशोत्सव मंडळांच्या मूर्र्तींचे विसर्जण होणार आहे. त्या दृष्टीने पोलीस निरीक्षक डी.के.परदेशी यांनी बंदोबस्ताची आखली केली आहे.साकळीत उद्या विसर्जनसाकळी येथे मंगळवारी गणेश विसर्जण राहणार आहे. गौरी-गणपतीचे विसर्जण एकाच दिशी करण्याची साकळीची परंपरा आहे. मात्र या वेळेस साकळीतील गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मंगळवारी राहणार आहे. गेल्या काही दिवसातील साकळीतील अप्रिय घटना पाहता पोलीस प्रशासन व ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे.पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अन्य गावांतील गणेशोत्सवाचे विसर्जन असे राहील- सातव्या दिवशी किनगाव (७), अट्रावल (५), निमगाव (३), आडगाव (२), मोहराळे (१), नवव्या दिवशी सातोद (१), तर शेवटच्या दिवशी टाकरखेडा, सांगवी बुद्रूक चितोडा (४), डोंगरकठोरा (५), अंजाळे (३), टेंभी (१).
यावल येथे आज पाच दिवसीय गणेश मंडळांच्या मूर्र्तींचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 6:25 PM
साकळीत उद्या गणेशोत्सवाचे विसर्जन
ठळक मुद्देमिरवणूक दरम्यान कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक परदेशी यांनी दिला आहे.मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे राहणार आहेत. ते लावण्याचे काम सुरू आहे.सोमवारी ४० गणेशोत्सव मंडळांच्या मूर्र्तींचे विसर्जण होणार आहे.