जळगाव : जिल्ह्यात सोमवारी वेगवेगळ्या ठिकाणी सहा अपघात झाले. त्यात एका विद्यार्थ्यासह पाच जण ठार झाले. तर माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या पत्नी डॉ.वर्षा पाटील या बालंबाल बचावल्या. शहरानजीक असलेल्या कुसुंबा गावाजवळ रिक्षातून उतरुन घरी जाण्याच्या तयारीत असतानाच मागून भरधाव वेगाने आलेल्या वाळूच्या डंपरने ईश्वर रतन मिस्तरी (३५, रा.कुसुंबा, ता.जळगाव) या तरुणाला चिरडल्याने तो जागीच गतप्राण झाला. सकाळी साडे अकरा वाजता हा अपघात झाला.दुसऱ्या घटनेत वडिलांची औषधी घेण्यासाठी जळगाव शहरात येत असताना रस्त्याने थांबून तोंडाला रुमाल बांधण्याची तयारी करताना मागून भरधाव वेगाने आलेल्या कारने उडविल्याने महेश दिलीप म्हाळके (२२, रा.गोरगावले, ता.चोपडा) या तरुणाची जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी सकाळी साडे आठ वाजता चोपडा-विदगाव मार्गावरील देवगावजवळील चेरी फॅक्टरीजवळ झाला.नशिराबादजवळ महामार्गावर डॉ.वर्षा पाटील यांच्या कारला डंपरने धडक दिली. त्यात चालकासह त्या बालंबाल बचावल्या. सकाळी साडे नऊ वाजता हा अपघात झाला.कुºहे पानाचे येथे शेतात कामाला जात असतांना प्रल्हाद तुळशिराम पाटील (६५,) यांना भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडे सात वाजता कुºहे पानाचे येथे घडली.हिंगोणा, ता.यावल गावाजवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली. अलाउद्दीन मुबारक तडवी (३५, रा. तडवीवाडा, यावल) व पंखा बाबू पवार (४०, रा.हलखेडा ता. मुक्ताईनगर) या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर नवाब मुबारक तडवी (रा.फैजपुर) व रितेश धारसिंग पवार (रा. हलखेड ता मुक्ताईनगर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना यावल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यात सहा अपघात पाच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 6:50 PM
जिल्ह्यात सोमवारी वेगवेगळ्या ठिकाणी सहा अपघात झाले. त्यात एका विद्यार्थ्यासह पाच जण ठार झाले. तर माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या पत्नी डॉ.वर्षा पाटील या बालंबाल बचावल्या. शहरानजीक असलेल्या कुसुंबा गावाजवळ रिक्षातून उतरुन घरी जाण्याच्या तयारीत असतानाच मागून भरधाव वेगाने आलेल्या वाळूच्या डंपरने ईश्वर रतन मिस्तरी (३५, रा.कुसुंबा, ता.जळगाव) या तरुणाला चिरडल्याने तो जागीच गतप्राण झाला. सकाळी साडे अकरा वाजता हा अपघात झाला.
ठळक मुद्देतीन ठिकाणी डंपरची धडकविद्यार्थ्याला कारने उडविलेमाजी खासदार यांच्या पत्नी अपघातात बचावल्या