भुसावळ : शहरातील आठवडे बाजारात भाजीपाला लिलाव व विक्रीस मनाई असताना सोशल डिस्टन्सिंग न पाळता भाजीपाल्याचा लिलाव केल्याप्रकरणी पथकाने सुमारे ५ लाखाचा भाजीपाला जप्त केला आहे.प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद, महसुल व पोलीस पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शनिवार रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास गुप्त माहितीवरून आठवडे बाजारात गेले.या ठिकाणी मनाई असतानाही लिलाव सुरू होता. त्यामुळे पथकाने कारवाई करीत सुमारे ५ लाखांचा भाजीपाला जप्त करुन १७-१८ वाहनेही ताब्यात घेतले.नगरपरिषदेच्या माध्यमातुन शहरातील सर्व वॉर्ड, गल्ल्यांमध्ये जाऊन लाऊड स्पिकरद्वारे सकाळी ११ ते ३ या काळात फक्त अत्यावश्यक सेवांची दुकानेच सुरु राहत असून,तशी सुचना नागरिकांना दिली जात आहे.रस्त्यावर अतिरिक्त कुमकगेल्या आठवड्यापासून पालिकेने पथके स्थापन केली असून त्यांनी दंडात्मक कारवाई व काही गुन्हे दाखल केले होते. मात्र या धडक कारवाई मुळे एकच खळबळ उडाली आहे. रस्त्यांवर आता अतिरिक्त पोलिस कुमक उतरवण्यात आली आहे.बाजारात काही वेळ पळापळपोलीस प्रशासनाचा ताफा बाजारात आल्यामुळे लिलावासाठी भाजीपाला विक्रीस आणणाºया विक्रेत्यांनी आहे त्या स्थितीत भाजीपाला सिनेस्टाईल जागेवरच सोडून दिला व मिळेल त्या मागार्ने पळापळ केलीदररोज पंधरा गुन्हा दाखल करण्याचे आदेशप्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांनी करून संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. दररोज संचार बंदीच्या काळात रस्त्यावर फिरणारे व नियम न पाळणारे विक्रेते यांच्याविरुद्ध कमीत कमी १५ गुन्हे दाखल करण्याच्या सूचना करण्यात आल्या.मास्क न लावणाºयांवर झाली कारवाईमास्क न लावता फिरणाºयांवर शहरात कारवाई करत ३५०० रुपये दंड करण्यात आला तर भाजीबाजारात नाहक गर्दी करणाºया ५५ वाहनधारकांना प्रत्येकी ५० रुपयांचा दंड करण्यात आला. अस्ताव्यस्त लावलेल्या मोटर सायकलचीं हवाही काढली.किराणा दुकानाला २ हजाराचा दंडनेब कॉलनी येथे विशाखा प्रोव्हिजन मध्ये मास्क न लावता किराणाचे सामान देत असताना व ग्राहकांमध्ये कोणतेही सोशल डिस्टन्सचे नियम पाळत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर दोन हजाराची दंडात्मक कारवाई दुकानदारावर करण्यात आली.जप्त केलेला माल संस्थांना देणारजप्त केलेला हा भाजीपाला कोरोनाच्या काळात गरीब व गरजू लोकांची जेवणाची सुविधा करणाºया नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांना देण्यात येणार असल्याचे प्रांत रामसिंग सुलाणे, मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी सांगितले .
भुसावळ येथे पाच लाखांचा भाजीपाला जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 9:20 PM