शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

वडोदा वनक्षेत्रात पाच बिबटे, मानवी हल्ले मात्र अत्यल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 3:26 PM

मानव व वन्यजीव प्राण्यातील संघर्ष टाळण्यासाठी वनविभागातर्फे करण्यात येणारे प्रयत्न त्यांचे मानवी हल्ल्यावरचे प्रमाण अत्यल्प ठेवण्यास यशस्वी ठरले आहेत.

ठळक मुद्देमानव व वन्यजीव प्राण्यातील संघर्ष कमी करण्यासाठी वडोदा वनविभागाचे प्रयत्नवन्यजीव प्राणी हा जंगलांचा व निसर्गाचा महत्त्वपूर्ण घटक

विनायक वाडेकरमुक्ताईनगर : नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या वडोदा वनविभागांतर्गत बिबट्यांची संख्या असली तरी मानव व वन्यजीव प्राण्यातील संघर्ष टाळण्यासाठी वनविभागातर्फे करण्यात येणारे प्रयत्न त्यांचे मानवी हल्ल्यावरचे प्रमाण अत्यल्प ठेवण्यास यशस्वी ठरले आहेत.वनविभागाचा जनजागृतीवर भरवडोदा वनक्षेत्र हे महाराष्ट्रातील पट्टेदार वाघांचे वास्तव्य असलेले सुप्रसिद्ध असे जंगल आहे. १४ हजार हेक्टर विस्तीर्ण अशा वनजमिनीवर पसरलेल्या या रानात बिबट्यांची संख्या तब्बल पाच आहे. वाघांचे वास्तव्य असलं तरी कोºहाळा, भोटा, सुळे, रिगाव या नदीकाठच्या गावांमध्ये त्याचे वास्तव्य दिसून येत आहे. वाघाचे वास्तव्य असल्याने बिबट्याचा वावर हा कमीच आहे. मात्र तरीदेखील मानवी वस्तीत येऊन मानवी हल्ले होऊ नयेत यासाठी वनविभागाने जनजागृती अभियान राबवले आहे. वनाचे महत्त्व, त्यासोबतच वन्यजीव प्राण्यांचे जंगलांच्या वास्तव्यासाठी असलेले महत्त्व हे जनतेला पटवून देण्यासाठी विविध प्रसंगी जनजागृती अभियान राबवले जाते. एवढेच नव्हे तर अतिशय जंगलाला लागून असलेल्या गावांमध्ये वेळोवेळी सतर्कतेचे इशारे देत सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी वनविभाग तत्पर असते. माणसांनी जंगलात जाऊ नये म्हणून गॅस वाटप करण्यात आले. अत्यल्प दरात रहिवाशांना गॅस मिळत असल्याने जळाऊ लाकडांचा उपयोग इंधन म्हणून कमी झाल्याचे जाणवत आह.ेया जनजागृतीमुळे काही बोटावर मोजण्याइतके प्रकार वगळता मानव आणि वन्यजीव प्राणी यांच्यातील संघर्ष दूर ठेवण्यास आतापर्यंत वनविभागाला यश आले आहे.आतापर्यंत बिबट्यांच्या मानवी हल्ल्याच्या केवळ चार ते पाच घटनाबिबट्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत मयत व्यक्ती झाल्याच्या घटना मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वनविभागाच्या अंतर्गत तरी घडल्याचे दिसून येत नाही. चार ते पाच हल्ले बिबट्याने आतापर्यंत भोटा, कोºहाळा, सुळे आणि रिगाव या वनविभागाच्या परिसरात केलेल्या असल्या तरी त्यात कोणी दगावले नाही. भोटा शिवारात नुकतेच वासरूवर हल्ला करून ठार करण्याची घटना घडली होती. एवढेच नव्हे तर बकरीदेखील फस्त करण्यात बिबट्याला यश आले आहे. परंतु मानवी हल्ल्याच्या घटना घडलेल्या नाही.वन्यजीव प्राणी गावात येण्यासाठी उभारल्या उपाययोजनावन्यजीव प्राणी आणि मानवजातीतील संघर्ष हा पूर्वीपासून चालत आलेला आहे. मात्र वडोदा वनपरिक्षेत्र अंतर्गत अतिशय शिस्तबद्धरित्या संरक्षण योजना या राबवल्या जात असल्याने प्राणी जंगलातून गावाकडे येणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. उन्हाळ्यात जंगलातील पाणी कमी झाल्यानंतर बिबट्या किंवा इतर तृणभक्षी प्राणी हे जंगलातून गावाकडे धाव घेत असतात. मात्र वनविभागाअंतर्गत उन्हाळ्यात पाणवठे, मातीचे बंधारे व सिमेंट बंधाऱ्यात पाणी सोडले जाते. जेणेकरून वन्यजीव प्राणी हे जंगल सोडून बाहेर येत नाही. वडोदा वनविभागाच्या अंतर्गत १६ पाणवठे, २० वनबंधारे व जवळपास १० सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. प्राण्यांना मानवी वस्तीकडे वळण्यासाठी मज्जाव करण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जातो. एवढेच नव्हे तर चारठाणा भवानी संवर्धन क्षेत्र अंतर्गत पाच कोटी रुपये योजनेची गवत लागवड ही योजना गेल्या चार वर्षांपासून राबवली जात आहे. त्यासाठी निधी उपलब्ध नसला तरी गेल्या चार वर्षांपूर्वी गवत लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. त्यामुळे तृणभक्षी प्राणी हे महसुली विभागात न जाता चारठाणा जंगलातच राहतात व त्यावरच मांसभक्षक प्राणीदेखील जीवन जगत असल्याने प्राण्यांचा गावाकडे येण्याचा ओढा हा क्वचित आहे.नियमित गस्त व मेंढपाळ, स्थानिक रहिवाशी यांच्यामध्ये असलेला समन्वय यातून बºयापैकी वन्यजीव प्राण्यांचे संरक्षण केले जात आहे. एवढेच नव्हे तर गेल्या वर्षी शिकारीसाठी आलेले बºहाणपूर भागातील काही शिकारीदेखील वन वभागाने पकडले होते.वडोदा वनविभागात वन्यजीव प्राणी व वने यांचे महत्त्व सर्वसामान्य जनतेला पटवून देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामुळे मानव व वन्यजीव प्राणी यांच्यातील संघर्ष कमी करण्यास आम्हाला यश आले आहे. वन्यजीव प्राणी हा जंगलांचा व निसर्गाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. सर्वांनी त्यांच्या संरक्षणासाठी पुढे सरसावले पाहिजे.-अमोल चव्हाण, वनक्षेत्रपाल, वडोदा 

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारMuktainagarमुक्ताईनगर