आॅनलाईन लोकमतजळगावदि,२६ : पोलीस बॉईज व शनी पेठ पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात राहणा-या तरुणांच्या दोन गटात रविवारी दुपारी जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर शनी पेठ हद्दीतील पाच तरुणांना जिल्हा रुग्णालयात दोन तरुणांवर झालेल्या हल्लयाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. या प्रकरणात आणखी आरोपी वाढणार असल्याची शक्यता पोलीस अधिका-यांनी व्यक्त केली आहे.पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर रविवारी दुपारी तरुणांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती त्यात शनी पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चंद्रशेखर सदाशिव कोळी , राहूल रतिलाल सपकाळे, पंकज हरी तायडे व सुदर्शन भिका कोळी रा.पाळधी, ता.धरणगाव तर दुस-या गटातील पोलीस बॉईज निलेश सोपान पाटील (रा.शामराव नगर, आशाबाबा नगर, जळगाव), मोंटू अभिमन्यू इंगळे (रा. पोलीस लाईन दक्षता नगर, जळगाव), राजेश नथ्थू शिंदे (रा.आसोदा, ता.जळगाव), पुष्पक मुकेश पाटील (रा.पोलीस लाईन, दक्षता नगर, जळगाव) या ९ जणांविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात झाला होता. हा गुन्हा जामीनपात्र असल्याने सर्व ९ जणांना जामीन झाला.
यांना घेतले दुसºया गुन्ह्यात ताब्यातराहूल रतिलाल सपकाळे (वय २१ रा.वाल्मिक नगर, जळगाव), चंद्रशेखर सदाशिव कोळी (वय २३, रा.कांचन नगर, जळगाव), पंकज हरी तायडे (वय २१ रा.कांचन नगर, जळगाव), सुदर्शन भिकन सौदाने (वय १९ रा.कांचन नगर, जळगाव) व समीर अरीफ शाह (वय २० रा.पाळधी, ता.जळगाव) या पाच जणांना दुस-या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले. शेख सलमान शेख मेहबूब (वय १९ रा.तांबापुरा, जळगाव) या तरुणाला ३१ डिसेंबर २०१७ रोजी जिल्हा रुग्णालयात मारहाण झाली होती. या सर्वांना न्यायालयाने २८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अॅड.आशा शर्मा यांनी काम पाहिले.